काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणा-या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली.
यानंतर रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या एका बड्या नेत्याने माझे नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप रश्मी बर्वे यांनी केला.
भाजपाचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूने राहतो आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे मला त्या बड्या नेत्यापासून मोठी अपेक्षा होती.
पण, माझ्या प्रकरणात माझ्यावर अन्याय होत असताना भाजपाचा तो नेता आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे त्या आंधळ्या, मुक्या आणि बहि-या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया रश्मी बर्वे यांनी दिली.