बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान श्री. बंकटस्वामी शिक्षण संस्थेचे आहे. वारकरी संप्रदायामधील महान संत श्री. बंकटस्वामी महाराजांच्या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली. संस्था स्थापनेचा जो उद्देश आहे. तो सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनणे. हा उद्देश सार्थ करण्यासाठी आणि श्री. बंकटस्वामी महाराज यांच्या नावाला साजेसे दर्जेदार काम करण्यासाठी सर्व कार्यकारी मंडळ सदैव कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन संस्था सचिव श्री. मच्छिंद्र अण्णा घरत यांनी केले. बीड येथील श्री. बंकटस्वामी महाविद्यालयात श्री. बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प. गंगाभारती हरीहर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी श्री. घरत बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर संपादक वैभव स्वामी, ह. भ. प. सुरेश महाराज जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. गणेश पोकळे,माजी प्राचार्य डॉ. बिभीषण भैरट, संस्थेचे सदस्य भाऊसाहेब मुंडे, बद्री शिंदे, सुरेश साबळे, ज्ञानेश्वर घरत, प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. घरात म्हणाले की, या शिक्षण संस्थेची शिक्षण क्षेत्रामध्ये उज्वल परंपरा आहे. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था करत आहे. वारकरी संप्रदायामधील महान संत श्री. बंकटस्वामी महाराज यांच्या नावाने ही संस्था कार्यरत आहे. त्यांच्या नावाला साजेसे कार्य हे कार्यकारी मंडळ आगामी काळात करून संस्थेचा नावलौकिक करेल असेही श्री. घरत म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. गणेश पोकळे यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ह.भ.प. सुरेश महाराज जाधव म्हणाले की, वारकरी संप्रदायामधील बंकटस्वामी महाराज चालते बोलते विद्यापीठ होते. भक्तीचा सुर्य बंकटस्वामी महाराज आहेत. संस्थेचा नावलौकिक करण्यासाठी बंकटस्वामी संस्थान परिवार नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या पाठीशी सदैव आहे. आपले मनोगत व्यक्त करताना संपादक वैभव स्वामी म्हणाले, संस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये पत्रकारिता क्षेत्र म्हणून आम्ही सदैव सोबत राहू. अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. बिभीषण भैरट, प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बप्पासाहेब हावळे यांनी केले. तर शेवटी आभार हाकदार सर यांनी मानले. या कार्यक्रमाला रमेश पाटील, महादेव खोसे, शहाजी कोल्हे, प्रा. प्रमोद जाधव, प्रा. प्रशांत माने, प्रा. वैद्य, श्रीकृष्ण जाधव, प्रशांत कोल्हे, दत्ता जगदाळे सर,सुपेकर सर,खरसाडे सर, सपकाळ सर, लेणे सर कर्मचारी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post