
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांनी आपला जीव गमावला आहे. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले आहे. घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.अपघातातील जखमींवर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अतिशय चिंतानजक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते.
दरम्यान, कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल (सोमवारी ९ डिसेंबर) रात्री भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ५० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला, त्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना केली.