- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते. अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.
हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा