राज्यातील 11 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत बऱ्याच मतदारसंघात समाधानकारक मतदान झाले नव्हते. मात्र काही मतदारसंघ नंदुरबार मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सुरुवातीपासूनच चांगले दिसून येत होती. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानापेक्षा चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
कारण या 11 मतदारसंघात चुरशीच्या लढती होत असून मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रभाव निवडणूक निश्चित दिसून येणार आहे. त्यामुळे ही टक्केवारी वाढली असण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये पाच पर्यंत जवळपास 58% मतदान झालेलं होतं जळगाव 52 टक्के, रावेर 55.36 टक्के मतदान झाले होते.
मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
*लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान*
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – ६०.६० टक्के
जळगाव – ५१.९८ टक्के
रावेर – ५५.३६ टक्के
जालना – ५८.८५ टक्के
औरंगाबाद – ५४.०२ टक्के
मावळ – ४६.०३ टक्के
पुणे – ४४.९० टक्के
शिरूर – ४३.८९ टक्के
अहमदनगर- ५३.२७ टक्के
शिर्डी – ५२.२७ टक्के
बीड – ५८.२१ टक्के
***