
मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यात काय? एक जण म्हणाला अजित पवारांना शरद पवारांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा वळल्या असत्या म्हशी.” असं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा घेतली त्यात अजित पवारांनी हे भाष्य केलं.“बारामतीत साठीच्या आतील आणि तरुण मंडळी म्हणायचे आम्हाला अजित दादा हवा. पण साठीच्या पुढची मंडळी म्हणायचे, नको राव उतार वयात पवार साहेबांसोबत राहू, असं भावनिक राजकारण केल्यानं विकास होत नाही”, असंही अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आला