अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज होऊन स्वत:ला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये आहे. दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी भेट दिली. दानवे यांनी खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अर्जुन खोतकर यांनी दानवे यांनी घरी येऊन भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, रावसाहेब दानवे घरी आले होते. त्यांनी प्रचारामध्ये येण्याची विनंती केली आहे. मी त्यांच्याकडे दोन दिवसांचा अवधी मागितला असून वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार आहे. आमची चर्चा चांगली झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी नाराज नाही, मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. वाशिम यवतमाळ आणि संभाजीनगरची जबाबदारी दिली आहे. पक्षाने जबाबदारी सांभाळावी लागते. या भेटीमध्ये आम्ही नाराजीवर बोललो, तसेच काय नाराजी असल्याचे त्यांना सांगितले असून वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाईल.