

महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते. रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला कुठे हमीभाव मिळाला नाही. मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. देशातील घराणेशाही आधी संपवा, मगच लोकशाही वाचेल. सध्या लोकशाही संपत चालली आहे. मोदी 2014 पासून झाले. तेव्हापासून 17 लाख नागरिक देश सोडून गेले आहेत. हे सरकार वसुली करणारं सरकार आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला