
महाविदयालयामध्ये प्रवेशित विदयार्थ्यांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज या कार्यालयामध्ये सादर करण्यात आलेले आहे.या आर्थीक वर्षापासुन त्यांना व्हीपीडीए नवीन प्रणाली लागु झाल्याने तसेच विद्यार्थ्यांनची स्वाधार शिष्यवृत्तीची रक्कम व्हीपीडीए या नवीन प्रणाली मधुन त्यांच्या वैयक्तीक बैंक खात्यावर वर्ग करणेकरीता विद्यार्थ्यांचे वैयक्तीक पॅन कार्ड ची छायांकीत प्रत व बँक खात्याचे कॅन्सल्ड चेक (स्वाधार योजनेचा फॉर्म मध्ये नमुद खात्याचा) याची तात्काळ आवश्यकता आहे.
तरी, आपल्या महाविदयालयामध्ये प्रवेशित विदयार्थ्यांनी सन 2022-23 व सन 2023-24 या शैक्षणक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज या कार्यालयामध्ये सादर केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणेकरीता उपरोक्त कागदपत्रे प्राप्त करुन तात्काळ या कार्यालयास सादर करावेत.