
लातूर हे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच केंद्र असून लातूरकरांनी लातूर शहराला अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी भाजप उमेदवाराला विजयी करावं अस आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लातूरच्या जन आशीर्वाद सभेत केले. त्यांची भर उन्हात सुरू झालेली सभा मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली. लातूरकरांना माझा नमस्कार या मराठी वाक्याने त्यांनी सुरुवात करून या सभेत काँग्रेसवर अत्यंत परखड शब्दात टीका केली. काँग्रेस म्हणजेच परिवार वाद असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रा. जोगेंद्र कवाडे लातूरचे पालकमंत्री, लातूर जिल्ह्यातील आमदार, माजी खासदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते