
संविधान बदलणार, आरक्षण हटवणार’ असा विरोधक खोटा प्रचार करत आहेत. पण गेल्या दहा वर्षातील माझा कारभार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की एससी, एसटी व ओबीसी समाजासाठी आम्ही खूप काही केले आहे. आमच्या मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. सर्व समाजाला न्याय देण्यासाठी व सर्व योजना सर्वांसाठी हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. कर्नाटकात असाच प्रचार करून काँग्रेसची मंडळी सत्तेवर आली व अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा त्यांनी का घाट घातला आहे पण मी हे होऊ देणार नाही. गेल्या साठ वर्षात काँग्रेसने मागासलेल्यांना पुढे आणण्यास चे काम केलेच नाही केवळ यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता या निवडणुकीत विरोधकांकडे विकासाचा काहीच मुद्दा नाही.
देशाला विकासाकडे नेण्यासाठी व माझे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरकरांना केले.