
राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांनी ५२२ अर्ज दाखल झाले होते.या अर्जांची छाणनी प्रक्रिया नुकताच पार पडली. अर्जांची छाणनी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात २१,
बारामती लोकसभा मतदारसंघात ४६ ,
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३५,
लातूर लोकसभा मतदारसंघात ३१,
सोलापूर लोकसभा मतदारसंघात ३२,
माढा लोकसभा मतदारसंघात ३८,
सांगली लोकसभा मतदारसंघात २५,
सातारा लोकसभा मतदार संघात २१,
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ९,
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३२
उमेदवारांचे असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.