बीडमध्ये आज संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच मेघ गर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे हवेतील उकाडा कमी झाला असला तरी शेतीला फटका बसला आहे. आंबा बागायतदार आणि द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात सापडले आहेत.
एकीकडे राजकारण तापत असतांना दुसरीकडे अस्मानी संकट उभे राहिले आहे.