बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सव 2026 चे 4 आणि 5 सप्टेंबर रोजी शिरसाळा येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होत. वादविवाद स्पर्धेचा प्रस्ताव निसर्ग चक्र आणि तंत्रज्ञान यामुळे मानवी भविष्य धोक्यात येत आहे? हा होता.

या अंतर्गत झालेल्या वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील प्रतीक्षा शेळके आणि आर्यवी मिसाळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 55 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
याच महाविद्यालयातील बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सव 2025 मध्ये समर्थ गावडे आणि बालाजी सराटे या विद्यार्थ्यांनी वाद व्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक पटकावले होते. शेळके आणि मिसाळ यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री रमेशभाऊ पोकळे, सचिव प्रा. गणेश पोकळे, प्र.प्राचार्य बाबासाहेब हावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी, प्रा. सुहास गाढवे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे