
माझ्या राज्यसभा खासदारकीचा उपयोग समाजातील सर्व घटकांच्या उन्नती बरोबरच लिंगायत समाजाच्या उन्नती, उत्कर्षासाठी समर्पित असेल अशी भावना नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांनी व्यक्त केली. नांदेड मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार दौऱ्यासाठी कवठा येथील बसवेश्वर नगर मध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, भाजपाचे प्रदेश सचिव देविदास राठोड, महानगर अध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते, प्रवीण साले, अड. चैतन्य देशमुख यांच्यासह अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी भाजपाने नेहमीच लिंगायत व इतर ओबीसी समाजाच्या हितासाठी लक्ष दिल आहे, लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी संघ प्रचारक म्हणून कॉलेज जीवनामध्ये कार्य केले असल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी काढली