श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था खडकीघाट, ता. जि. बीड मध्ये मागच्या वीस वर्षापासून विविध व्यवस्थापन मंडळामार्फत केल्या जाणाऱ्या दावे प्रतिदाव्यावरून प्रलंबित असणाऱ्या उच्च न्यायालयातील निवाड्यात अँड.एन. पी.पाटील जमालपुरकर यांनी विद्यमान सचिव श्री मच्छिंद्र घरत यांची बाजू व्यवस्थित मांडल्याने त्यांना आज बंकट स्वामी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम पाहता येऊ लागले. यासाठी अॅड. एन. पी.पाटील जमालपूरकर यांनी अतिशय मोलाचे कार्य केले असून बंकट स्वामी शिक्षण संस्थेतील तीडा सोडविला.त्याबद्दल त्यांचा आज संस्थेचे सचिव श्री मच्छिंद्र घरत ,उपाध्यक्ष प्राचार्य गणेश पोकळे, कोषाध्यक्ष श्री मुंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी सचिव श्री मच्छिंद्र घरत यांनी अॅड. जमालपुरकर हे श्री बंकटस्वामी भक्त असून रामभक्ता प्रमाणे त्यांनी आमच्या संस्थेतील तीडा सोडवला असे गौरवोद्गार काढले..
अॅड. जमालपुरकर यांनी संस्थेतील तीडा सोडविला
Leave a comment
Leave a comment