बीड दि. 23 (प्रतिनिधी) लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनच आपले कर्तृत्व बजावले असे नाही तर, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय पातळीवर जहालवादी विचाराचे राजकीय नेतृत्व प्रदान करून राष्ट्रीय काँग्रेसची ध्येय धोरणे बदलून टाकली. जहाल विचारांची मत अधिक प्रमाणात रुजवली असे विचार प्रा. गणेश पोकळे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय व संभाजीराजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राचार्य आर डी सय्यद, प्रशासक बप्पासाहेब हावळे, प्रा. शिवशंकर पटवारी यांच्या सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी, लोकमान्य टिळकांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा वसा आणि वारसा चालवण्याची नितांत गरज असून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले तर त्या क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे फायदा होईलच पण त्यांना वैयक्तिक व ते काम करत असलेल्या संस्था ठिकाणांना देखील फायदा होतो असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोमल सुरवसे यांनी तर आभार प्रा. शिवशंकर पटवारी यांनी मानले. यावेळी प्रा देविसिंह शिंदे,प्रा रसाळ अतूल, लॅब असिस्टंट कानिफनाथ खराडे संध्या खोसे, दीपक जाधव, जयश्री जोजारे, सुरवसे प्रिती, मंगेश खराडे अनिल बावणे सचिन चौरे, यांची उपस्थिती होती.