By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > अंतरराष्ट्रीय > जागतिक पालक दिन: ग्रामीण पालकत्वाचे वास्तव आणि आव्हाने*
अंतरराष्ट्रीय

जागतिक पालक दिन: ग्रामीण पालकत्वाचे वास्तव आणि आव्हाने*

Beedlive Team
Last updated: June 1, 2025 1:18 pm
By Beedlive Team
Share
4 Min Read
SHARE

जगभरात आज 1 जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जात आहे.संयुक्त राष्ट्र संघटनेने 2012 मध्ये या दिवसाची घोषणा केली पालकांचा त्याग समर्पण निस्वार्थ प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

शहरांमध्ये पालकत्वाची भूमिका अधिक संवादात्मक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असली तरी ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे अजूनही अनेक गावांमध्ये मुलांना शिक्षणापेक्षा कापूस वेचणी, सोयाबीन काढणे, जनावरांना चारा आणणे, किंवा लहान भावंडांची जबाबदारी सांभाळणे हे महत्त्वाचे मानले जाते.
अनेक गावांमध्ये जून महिन्यात शाळेचा पहिला आठवडा मुळीच सुरू होत नाही कारण त्याचवेळी कापसाच्या पेरण्या सोयाबीनची मशागत आणि पेरणीचं काम सुरू असतं ग्रामीण भागातील अनेक पालकांना वाटतं की शाळा काही दिवस चुकले तरी चालेल,पण शेती मागे राहू नये.
या मानसिकतेमुळे मुलांच्या शैक्षणिक पाया दुर्बल राहतो. सातत्याने शिक्षणात खंड पडल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष नसते, परीक्षांचे निकाल नकारात्मक येतात. आणि हळूहळू शिक्षणाची गळती होते याचा फटका ग्रामीण विद्यार्थ्यांना बसतो.
शाळांमध्ये होणाऱ्या पालक मेळावांना उपस्थित राहण्याची संख्या फारच कमी असते.यामागे शिक्षणाचे महत्त्व न समजणे, किंवा त्याला वेळ देणे आवश्यक वाटत नसण्याचे मुख्य कारण आहे. ग्रामीण भागात पालक शिक्षणाकडे फावला वेळेचा “उपक्रम” म्हणून बघतात.
शिक्षक सांगतात की, “पालक जर शाळेत यायला तयार नाही, तर मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही एकटेच काय करणार? शिक्षण हे केवळ शिक्षकांचे काम नाही, पालकांचाही सक्रिय सहभाग गरजेचा आहे.

घरातील महिला, विशेषता: आई मुलांच्या अभ्यासाची महत्त्वाची भूमिका निभावतात.पण ग्रामीण भागात बऱ्याच वेळा आईला शेती, स्वयंपाक, पाणी भरायचं काम आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकाच वेळी पार पाडावी लागते. त्यामुळे शिक्षणासाठी वेळ देण्यास सम्य होत नाही.
काही पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर करतात पण ही संख्या खूपच कमी आहे. कारण स्थलांतराच्या आर्थिक औझं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पेलणमाच्या बाहेर आहे.
सर्व शिक्षा अभियान “मिड डे मिल”,ई- लर्निंग या योजना कार्यान्वित असल्या तरी त्यांचा ग्रामीण भागात अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.योजनांची अंमलबजावणी, माहितीचा अभाव आणि व्यवस्थेतीव अनास्थ यामुळे ग्रामीण पालकापर्यंत त्या पोहोचत नाहीत.
ऑनलाइन शिक्षणाचा काळ सरला तरीही ग्रामीण भागात मोबाईल, इंटरनेट,आणि ई-लर्निंग साठी आवश्यक सुविधा आजही अभावी आहेत. त्यामुळे कोरोना काळात जी शैक्षणिक खाई निर्माण झाली ती अजूनही भरून निघालेली नाही.
सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात पालकांसाठी पालक कार्यशाळा घ्याव्यात जिथे त्यांना शिक्षणाचे महत्त्व मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांच्या विकासासाठी काय करावे हे शिकवले जाईल.
काही ठिकाणी अजूनही “मुलगा शिकला तर नोकरी करेल, मुलगी शिकली तर घरीच बसणार” अशा दृष्टिकोन आहे मुलींच्या शिक्षणाला दुय्यम स्थान दिला जाते. त्यामुळे लवकरच लग्न, शाळा सोडणे, आणि शिक्षणातील गळती वाढते.ग्रामीण भागात पालक आणि मुलांमधील संवाद फारच मर्यादित असतो. मुलांना काय आवडतं काय समजतं, काय अडचणी आहेत याचा पालकांना अंदाज नसतो. संवादाच्या अभावामुळे मुलं हळूहळू पालकांपासून दूर जातात.
फक्त पालक नव्हे तर संपूर्ण गाव, शाळा व्यवस्थापन समित्या, स्थानिक स्वयंसेवी संस्था ,यांचा सक्रिय सहभाग असावा लागेल .पालक ही एक सामाजिक जबाबदारी आहे.
प्रत्येक गावात दर पालक शिक्षक बैठक घ्यायला अनिवार्य करायला पाहिजे.प्रत्येक पालकांना शिक्षणाची प्रशिक्षण द्यावे पालकांसाठी प्रोत्साहन योजनांची अंमलबजावणी करावी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र निधी सुविधा द्याव्यात. लोकप्रतिनिधींनी यावर भर द्यावा.
शिक्षण हे मुलांसाठी भविष्याचा दाराची किल्ली आहे. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील पालकांनी मुलांच्या शिक्षणात फक्त नावापुरता नाही, तर सक्रिय प्रेम आणि जागरूक सहभाग नोंदवला पाहिजे कारण, शिक्षण देणे म्हणजे केवळ शाळेत पाठवणं नव्हे’ तर त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देणे.
*कु. आदिती विक्रम डावकर*

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?