By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > नीतिमान आणि श्रेष्ठ राजा – शिवछत्रपती
Uncategorized

नीतिमान आणि श्रेष्ठ राजा – शिवछत्रपती

Beedlive Team
Last updated: February 19, 2025 10:11 am
By Beedlive Team
Share
5 Min Read
SHARE

*कर्तव्यदक्ष, नीतिमान आणि श्रेष्ठ राजा – शिवछत्रपती*
*हिंदुस्थानाकडून प्रेरणा आणि व्हिएतनाम विजयाचे रहस्य*

थकून-भागून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, साप पाहून पळावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्या विहिरीत उडी मारावी, उडी मारता मारता एका फांदीला पकडावं, फांदीला मधमाशीचा पोळा असावा आणि मधाचा थेंब तोंडात पडावा…

याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

अन्नाच्या भुकेबरोबर विचारांची भूक मिसळली की क्रांतीची सुरुवात होते. मात्र, क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताच्या पायाखुणा लोक पाहू लागतात, त्यांच्या संसाराची राख होते. पण ज्यांनी क्रांतीत सहभाग घेतलेला नसतो, त्या पुढच्या पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात.

आमच्या महाराष्ट्राचा इतिहास शाहीरांच्या डफावर, घोड्यांच्या टापांवर, तलवारीच्या गजरात, दगडांच्या गडगडाटात आणि सह्याद्रीच्या अभेद्य कड्यांमध्ये लिहिला गेला. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून चाललेली पिढी जागी करणं गरजेचं आहे. तुमच्या चांगल्या आचारांनी, चांगल्या विचारांनी आणि उत्तम संस्कारांनी तुम्ही घडवत असलेली ही पिढी, हीच खरी आनंदाची गोष्ट आहे.

इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचं अज्ञान हा एक गुन्हा आहे. इतिहासाचं ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र-चिंतनासाठी मी प्रेरित झाली आहे.

संपूर्ण भारतभर ज्यांनी मुठभर मावळे घेऊन बलाढ्य मोगलशाहीला हादरवून सोडलं आणि स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश – श्रीमंत कुलवंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज! सह्याद्रीच्या कड्यांमधून हिंदवी स्वराज्याचं तेज प्रकट करणारा हा सह्याद्रीचा बाणेदार वाघ!

शिवरायांचा जन्म व बालपण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे,

“धर्मासाठी बलिदान द्या, मरण स्वराज्य प्राप्त करा!”

हे वचन शिवरायांनी पूर्णतः साकार केलं. त्यांच्या मातोश्री जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांचे संस्कार त्यांच्यावर होते.

अजून लहान असतानाच महाराज मोठ्या ध्येयांची स्वप्ने पाहू लागले. ते मावळ्यांना नेहमी विचारायचे –
“आपण सुलतानाच्या वतनदारीवर समाधान मानावं का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच पाणी प्यावं का? परकीय राजवटींमध्ये विनाकारण युद्धं होऊन आपली माणसं का मरावीत?”

हे ऐकताच मावळ्यांच्या रक्तात धग पेटायची. ते निर्धाराने म्हणायचे –

“राजे, बोला! तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही प्राणही देऊ!”

शिवराय – आदर्श शासक व नीतिमान राजा

शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश दिले होते –

“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका!”

म्हणजेच, जनतेचा एक पैसा देखील वाया जाता कामा नये.

त्यांच्या नीतिमत्तेचं उदाहरण देताना एक प्रसंग प्रसिद्ध आहे –

कल्याण मोहिमेदरम्यान, एका सरदाराने कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांसमोर उभी केली. तिला पाहून महाराज म्हणाले –

“अशीच आमची आई असती, तर आम्ही सुंदर झालो असतो.”

असं म्हणून त्यांनी तिला सन्मानाने तिच्या घरी परत पाठवलं.

शिवरायांची युद्धनीती आणि कुशाग्र बुद्धी

शिवाजी महाराजांनी युक्ती आणि कूटनीतीने शत्रूवर मात केली. एक परदेशी इतिहासकार म्हणतो –

“शिवाजी महाराजांच्या करंगळीएवढं राजकारण औरंगजेबाच्या संपूर्ण शरीरातही नव्हतं!”

प्रसिद्ध कूटनीतीचे काही उदाहरणे –

१. जयसिंगाशी तह करताना, २१ किल्ल्यांची यादी देऊन प्रत्यक्षात १७ किल्ले सोडले.
2. अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वतीय प्रदेशात आणलं.
3. आग्र्याहून सुटका करण्यासाठी आजारपणाचं नाटक केलं.
4. शत्रूंना अपमानित करण्यासाठी आरोग्याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रांची योजना केली.

ही सगळी राजकारणातील कुशलता महाराजांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेची साक्ष देते.

शिवरायांचे मावळे आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा

शिवरायांचा एकेक मावळा समोरच्या दहा शत्रूंना भारी पडायचा.

बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल कवी म्हणतो –

“जिवंत नरवीर लढले,
त्यात नवल कसले?”

मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्यावर आणि फर्जंद मावळ्यांच्या ताकदीवर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.

शिवराय आणि व्हिएतनाम विजय

व्हिएतनाम आणि अमेरिकेचं युद्ध तब्बल वीस वर्षं चाललं. अमेरिकेला वाटलं की व्हिएतनामचा निःपात करायला काही तासच पुरेसे असतील. पण झालं उलटंच!

व्हिएतनामचे राष्ट्रपती यांनी विजयाचं रहस्य सांगताना म्हटलं –

“युद्धकाळात एका शूर राजाचं चरित्र माझ्या हाती आलं. त्याच्याच नीतीनुसार आम्ही युद्धनीती ठरवली. आणि आम्ही जिंकलो!”

पत्रकारांनी विचारलं – “तो राजा कोण?”

राष्ट्रपती म्हणाले –

“छत्रपती शिवाजी महाराज!”

आणखी पुढे ते म्हणाले –

“हा महान पुरुष आमच्या देशात जन्माला आला असता, तर आम्ही जगावर राज्य केलं असतं!”

त्यांच्या समाधीवर आजही लिहिलं आहे –

“छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक!”

शिवरायांना वंदन!

शिवराय म्हणजे – आदर्श पुत्र, कुशल नेता, पराक्रमी सेनानी, लोकोत्तर प्रशासक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक!

“शिवरायांना आठवावं,
शिवरायांसारखं वागावं!”

जय भवानी! जय शिवाजी!

*कु.आदिती विक्रम डावकर*

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?