लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच काल संध्याकाळी भारतीय जनता पार्टीचे संकट मोचक ना. डॉ. गिरीश महाजन यांनी गुपचूप लातूरमध्ये येऊन नेते आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूरच्या उमेदवाराच्या बाबतीत भाजपचा एक मोठा गट अद्यापही निष्क्रिय असून महायुतीतील इतरही घटकांकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याच्या चर्चेला उधाण आहे. त्यामुळे ना. डॉ . महाजन हे नेमक्या कोणत्या कारणास्तव गुपचूप लातूर दौरा आटोपून लगेचच परत गेले याविषयी अनेक तर्क विचार लावले जात आहेत. गिरीश महाजन हे अनेक वेळेला पक्षांतर्गत निर्माण झालेले गुंतागुंत सोडवण्यात एक्स्पर्ट मानले जातात त्यांच्या या दौऱ्याचं नेमकं काय गुपित होतं हे अद्याप उघड होऊ शकलं नाही.