
बुधवार संध्याकाळ पासून सुरू झालेल्या आवकाळी पावसाची रिपरिप कधी संध्याकाळी तर कधी दुपारी तर आज सकाळी सहा वाजता सुरू झाली. मागच्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे लातूर आणि परिसरातील आंबा आणि द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. शिवाय भाजीपाला पिकांचे देखील या पावसामुळे मोठा नुकसान होणार आहे. शिवाय लातूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर तिळाचं पीक घेतलं होतं या पावसामुळे ते पिक देखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवस असेच अधून मधून पावसाचा आगमन होत राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या पावसाची धास्ती लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे