आज धुळ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री शोभा बच्छाव यांना २००९ च्या पालकमंत्री पदाच्या जोरावर धुळ्यात उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्याविरोधात स्थानिक नेतृत्वाने बंड केले आहे. बच्छाव यांचे नाव जाहीर होताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी राजीनामा देत उमेदवार बदलण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
बच्छाव यांना काँग्रेस मधीलच पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया, सनेर यांनी दिली आहे. हे सांगताना सनेर यांचा कंठ दाटूना आला होता. मुळात शोभा बच्छाव या धुळ्याच्या नाहीत. त्यांचे वडील धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने, शोभा यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेले आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील रहिवासी असून, त्यांची सासरवाडी मालेगाव मध्य मतदारसंघातील आहे.