माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून १६ एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळेधैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या आधी शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूज येथे एक मेळावा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.