विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे.
सदर प्रकरणी आपण रितसर तक्रार दाखल करणार असल्याचंही लोंढे यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत कधीही न घडलेली घटना, विरोध पक्षनेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली घट आणि त्यानंतर झालेला अपघात पाहता या घटनांची साखळी चिंताजनक असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.