शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला.
माझी महाराष्ट्रातील जनतेकडून अपेक्षा आहे की, व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तसे झाले तर पुढचे दिवस भीषण आहेत. वाटाघाटी सुरु होत्या तेव्हा मी यांना सांगितले मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे असे मी जाहीर करतो असें मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. यावेळी ते बोलत होते विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा
आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. १० वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.