भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये काय राहिलंय, काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. अशोक चव्हाण यांच्या या टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं आहे. त्यांनी राजयोग भोगला आहे.उलट काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाण यांनी प्लान केला होता, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधतना भाजप नेते अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.