By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > बिपरजॉय चक्रीवादळ दिशा बदलणार? पाकिस्तान नव्हे, आता गुजरातच्या दिशेनं वळवला मोर्चा; सतर्कतेचा इशारा!
Uncategorized

बिपरजॉय चक्रीवादळ दिशा बदलणार? पाकिस्तान नव्हे, आता गुजरातच्या दिशेनं वळवला मोर्चा; सतर्कतेचा इशारा!

Beedlive Team
Last updated: June 12, 2023 3:39 am
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अत्यंत तीव्र रुप धारण केलेले हे वादळ आता आपली दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. कारण हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातच्या किनारपट्टीकडे थोडेसे पूर्वेकडे हे वादळ सरकण्याचा अंदाज आहे. तसंच १५ जून रोजी येथे भूकंपाचा धोकाही संभवतो. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Contents
मुंबईपासून ५४० किमी अंतरावरअरबी समुद्रातील वादळ गुजरात किनाऱ्यावरगुजरातमध्ये भूकंपासह अतिवृष्टीचा इशाराप्रार्थना करूया की…- भूपेंद्र पटेल

“दिशा बदलल्याने गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर २-३ मीटरचे वादळ निर्माण होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच, शेती फळबागांच्या नुकसानीचीही भीती आहे. रेल्वे, पॉवरलाईन, सिग्नलिंग यंत्रणाही बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे”, असं प्रादेशिक विशेष हवामान केंद्राच्या (RSMC) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

मुंबईपासून ५४० किमी अंतरावर

बिपरजॉय चक्रीवादळाचे काल (११ जून) अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. हे वादळ काल मुंबई किनारपट्टीपासून ५४० किमी अंतरावर होते. यामुळे मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात रात्री जोरदार वारा सुटला होता. यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं.

१४ जूनपर्यंत हे वादळ उत्तर दिशेला सरकरण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ इशान्येकडे सरकेल. तिथून ते १५ जूनपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छची सीमा पार करून गुजरातचा मांडवी आणि पाकिस्तानातील कराची या पाकिस्तानी किनाऱ्यांना धडकेल, असंही या बुलेटीनमध्ये नमूद आहे.

हे वादळ गुजरातची सीमा टाळून पाकिस्तानकडे रवाना होईल, असा अंदाज शनिवारी लावण्यात आला होता. हे वादळ पुढच्या २४ तासांत उत्तर ईशान्य दिशेला सरकेल असे RSMC च्या शनिवारच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले होते. परंतु, सध्याच्या बुलेटिनमध्ये हे वादळ गुजरातची सीमा टाळेल असा कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही.

अरबी समुद्रातील वादळ गुजरात किनाऱ्यावर

अरबी समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यांना धडकत नाही. ७५ टक्के चक्रीवादळे उत्तरेच्या भागात वळतात. कधी कधी ही वादळं पाकिस्तान, इराण किंवा ओमनच्या दिशेने सरकतात. या वादळांचा वेग अतितीव्र असल्यासच ते भारताकडे सरकू शकतात. फक्त २५ टक्के प्रमाणात चक्रीवादळ ईशान्येकडे सरकते. त्यावेळीही याचा धोका गुजरातच्या किनारपट्ट्यांना अधिक असतो.

गुजरातमध्ये भूकंपासह अतिवृष्टीचा इशारा

गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर येथे भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, तोपर्यंत या वादळाची क्षमता कमी झालेली असेल. अत्यंत तीव्र चक्रीवादळ सौम्य होण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

प्रार्थना करूया की…- भूपेंद्र पटेल

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सहा जिल्ह्यांत ते पुढे ढकलण्याचे आदेश दिले आणि इतर दोन जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी तो कमी केला. “चक्रीवादळ आपल्या दिशेने सरकत आहे. म्हणून, प्रत्येकजण प्रार्थना करुया की हे वादळ गुजरातला धडकले तरी कमीत कमी नुकसान होईल. या वादळाचा गुजरातला फटका बसणार असल्याची शक्यता आहे,” असे पटेल यांनी छोटा उदेपूर जिल्ह्यातील बोडेली येथे एका मेळाव्यात सांगितले.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?