
राज्यात कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या चारही मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चारही जागा लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीमध्ये उमेदवारांची नावं निश्चित झाले असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमाला लाग पुढे महायुती म्हणून जो काय निर्णय होईल त्या वेळेस तो तो निर्णय घेवू अशा सूचना या बैठकीत दिल्या गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या तारखांची देखील घोषणा करण्यात आली होती.