
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 तारखेला होणार असून या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा जागांचा समावेश आहे. या 13 जागा अतिशय प्रतिष्ठेच्या बनविले गेले असून दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी मोठ्या प्रचार सभा काल पार पडल्या. आज या 13 मतदारसंघातील प्रचार थांबणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीने या 13 जागांवर कंबर कसली आहे
महाराष्ट्रातील मुंबईतील सहा आणि ठाणे कल्याण पालघर धुळे दिंडोरी नाशिक आणि भिवंडी मतदारसंघाचा समावेश आहे या पाचव्या टप्प्यातील मतदानात उत्तर प्रदेश ,पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा आदी राज्यातील जागांवर देखील मतदान होणार आहे