ग्रामपांचायतींचा उदय आणि विकास

11/11/2012 18 : 13
     633 Views

बीड ! प्रा.विठ्ठल एडके
जिल्ह्यामध्ये ७०० गामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सूरू आहे. सदस्य निवडून येणार आहेत. हे सर्व सभासद साक्षर, ग्रामपंचायत करभाराची ओळख असलेल असततीलच असे नाही.त्याच बरोबर सर्वसामान्य मतदाराला देखील ग्रामपंचायत कारभाराची महिती असते, असे नाही म्हणून बीड लाइव्ह च्या माध्यमातून मतदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ग्रामपंचायत कारभाराची माहिती व्हवी, यासाठी ग्रामपंचात कारभाराचा घेतलेला हा आढावा...
भारततात प्राचीन काळापासनू ग्रामपंचायतीचे अस्तित्व असल्याचे दिसते. त्यावेळी गावाचा कारभार पाहण्यासाठी पंचमंडळी असत.महाभारतातील ‘ सभापर्व’ ‘कैटिल्याचे अर्थशास्त्र’ या ग्रंथांमध्ये प्राचिन काळातील ग्रामपंचातीचे वर्णन पाहवयास मिळते. त्यानंतर ब्रिटिश कालखंडात लॉर्ड निपनने ग्रामपंचायती बळकट करण्याचे व तस आधुनिक सवरूप प्राप्त करुन देण्याचे कार्य केले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर महात्मा गांधिंच्या पंचायतीच्या कल्पनेस साकार करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम ४० नुसार ग्रामपंचायती स्थापन करण्याचे अधिकार राजय सरकाला देण्यात आले. यानुसार विविध घटक राज्यांनी ग्रामवपंचायत निर्मितीसाठी कायदे. केले.त्यामध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनिय १९५८ तयार केला. या अधिनियमानुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. काळानुसार य धिनियमात दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. आजही महाराष्ट्रातील ग्रामपंचायती या अधिनियमाद्वारे कार्य करीत आहते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमत्री यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेलया समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यात गावपातळीवर ग्रामपंचायतीला महत्वाचे स्थान देण्यात आले. या व्यवस्थेला घटनात्मकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ७३ वी घटना दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचातींना घटनात्मक दर्जा, स्थान प्राप्त झाला.
गावपातळीवर काम करणारी व सर्व समाजाचा सहभाग असणारी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायत महत्वाची आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्याची शाळा म्हणजे ग्रामपंचायत होय, यादृष्टीने ग्रामपंचायत कारभारकडे पाहावे लागेल., लोकसंख्यच्या आधारेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार ३०० किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात महसुल गावाचा दर्जा देण्यात येतो. गावाची लोकसंख्या, गावाचा विस्तार, जमीन, महसूल यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून चौकशी करून, वाग अथवा गावाच्या गटासाठी ग्रामपंचायत स्थपन करण्याची शिफारस राज्य शासनाकडे केली जाते. त्यानुसार राज्य शासन, मुंबई ग्रामपंचातींची स्थापना करते.
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात ठरविण्यात येते. ही सदस्य संख्या कमीत कमी ७ ते जास्तीत जास्त १७ असू शकते. सदस्य संख्या निश्खित केल्यानंतर समान लोकसंख्येच्या आधारावर गावाचे प्रभाग पाडले जातात. एका प्रभागातून कमीत कमी २ व जास्तीज जास्त ३ सदस्य निवडून दिले जातात. ही नवड प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. त्याचे वय १८ वर्षे पूर्ण आहे तसेच मतदारयातीत त्याच्या नावाची नोंद केली आहे, अशा व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. (क्रमशः)
comments