सुराज्यासाठी लोकमान्य महोत्सव

2016-09-02 8:14:00
     1456 Views

‘ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच ’ या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या १६० वे जयंती वर्ष सुरु आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या थोर नेत्याची जीवनगाथा व कार्य विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत, प्रामुख्याने आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याकरीता राज्यात विविध सांस्कृतिक उपक्रम साजरे करण्याचे शासनाच्या सांस्कृतिक कार्य नियोजन केले आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्यात ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभिमान हा सांस्कृतिक उपक्रम २०१६ व २०१७ या वर्षात राबविण्यात येईल. याविषयी थोडक्यात माहितीःः..
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभिमान
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी १२४ वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले, सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातुन टिळकांचे विचार त्यांची चतु:सुत्री तसेच अन्य उपक्रमांद्वारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची, स्पर्धा आयोजित करुन, गणेशोत्सव साजरा करून देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांबाबत मुल्यांकन करुण शासनाच्यावतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येईल व त्या मंडळांना रोख बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता तसेच बेटी-बचाव, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन यांपैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल त्या करता मंडळांची धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळांनी विहीत नमुन्यात तालुक्याच्या, गटशिक्षधिकऱ्यांकडे अर्ज करावा हे अर्ज ४ सप्टेंबर २०१६ पूर्वी करायचे असून लोकमान्य गणेशोत्सव अभिनयाची सविस्तर माहिती आवेदन अर्ज ुुु.र्लीश्रींरीरश्र.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपला स्पर्धेतील सहभाग थेट शासनाला कळविण्यासाठी ९२२७१९२२७१ या क्रमांकवर मिस कॉल दिल्यास आपला स्पर्धेत सहभाग नोंदविला जाईल.
या गणेशोत्सव अभियानात जिल्हयातील उत्कृष्ट मूर्तीकार यांचाही शासनाच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. सर्वोकृष्ट तीन क्रमांकाशिवाय काही गणेश मंडळांना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळांना शासनाकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
लोकमान्य महोत्सवासाठी राज्यस्तरावर राज्याचे वित्त व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे सांस्कृतिक कार्या मंत्री यांच्यसहअध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या सपर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याची पाहणी, तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण अधिकारी तर विभागीयसतरावर उपसंचालक (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल जर एखाद्या पारितोषिकासाठी दोन किंवा जास्त मंडळांना समान गुण प्राप्त झाले असतील तर निवड समिती सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाच्या क्रमांकाबाबत त्या मंडळाच्या नावाने सर्वांक्षमस जाहिर सोडत कडून तो क्रमांक निश्चित करतील.
या स्पर्धेत विभागीयस्तरावर प्रथम विजेत्या मंडळास २,००,०००/- रुपये, द्वितीय विजेत्यास १,५०,०००/-रुपये, तृतीय विजेत्यास १,००,०००/- रुपये जिल्हास्तर प्रथम विजेत्यास १,००,०००/- रुपये, द्वितीय विजेत्यास ७५,०००/-रूपये, तृतीय विजेत्यास ५०,०००/- रुपये,तालुकास्तरावर प्रथम २५,०००/-रुपये,द्वितीय विजेत्यास १५,०००/- रुपये, तृतीय विजेत्यास १०,०००/- या प्रमाणे स्पर्धेतील सर्व विजेत्या गणेश मंडळांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील.
लोकमान्य महोत्सवात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यानिमित्त एक टपाल तिकिट प्रकाशीत केले जाणार आहे. गणेशोत्सव झाल्यावर महोत्सवाचा दुसरा टप्पा प्रारंभ होईल. यात शासनाकडून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला ,पेंटींग या सह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

डॉ. रवींद्र ठाकूर
सहाय्यक संचालक
माहिती विभाग, औरंगाबाद
comments