बीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

2016-05-13 12:34:22
     1175 Views

आज स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी, समाजामध्ये आपले नावलौकिक करण्यासाठी पत्रकारिता हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहे.पारंपारिक व चाकोरीबद्ध शिक्षण घेऊन कारकून होण्यापेक्षा व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची संधी पत्रकारिता या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहे.
पत्रकारिता क्षेत्र म्हणजे समाज मनामध्ये आपली एक विशिष्ट प्रकारची वेगळी ओळख निर्माण करून देणारे क्षेत्र होय. पारंपारिक शिक्षण घेवून चाकोरीबद्ध व मर्यादित जीवन जगण्यापेक्षा पत्रकारिता हे करिअरचे क्षेत्र निवडुन समाजात निर्भिडपणे, स्वावलंबी व प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची उत्तम संधी आहे.
पारंपारिक शिक्षण घेवून ठरलेले मर्यादित व चाकोरीबद्ध काम करून आपल्या जीवनाला मर्यादा देण्यापेक्षा पत्रकारिता क्षेत्रातील १२ वी उत्तीर्ण विद्याथ्र्यांना इ.अ.(चउग) बॅचलर ऑफ आर्टस् इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी इ.ग. बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच च.अ.(चउग) मास्टर ऑफ आर्ट इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम हे पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून होतकरू व जिद्दी विद्याथ्र्यांना पत्रकारिता हे करिअरसाठी उत्तम क्षेत्र आहे.
पत्रकारितेचे शिक्षण घेऊन आपण वृत्तपत्रामध्ये आपल्या विचाराचे एक वेगळे व्यासपीठ निर्माण करू शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये समाजातील प्रत्येक व्यक्ती आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहत आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या स्वतंत्र ओळखी बरोबरच यशस्वी करिअर करण्यासाठी पुरक असे पत्रकारिता क्षेत्र आहे. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पदवी पास विद्याथ्र्यास पत्रकारिता क्षेत्रामध्ये वृत्तपत्राचे संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर,आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी , वृत्तवाहिनी वार्ताहर, वाहिनी अँकर, टी.व्ही.निवेदक, नभोवाणी निवेदक, प्राध्यापक इत्यादी विविध पदावर काम करू शकतो. आपण आपल्या मालकीचे वृत्तपत्र देखील काढु शकतो. त्याच बरोबर साप्ताहिक, मासिक देखील चालवु शकतो. यामध्यमातून आपण आपले विचार जनतेपर्यंत पोहचवू शकतो. समाजात होणा-या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी लढा उभा करू शकता. समाजाला त्याच्या हक्काची जाणीव करून देवून त्यांचे हक्क त्यांना प्राप्त करून देवू शकता. याचबरोबर आपले यशस्वी करिअर देखील बनवू शकता. म्हणूनच वृत्तपत्र हे सर्वसामान्य जनतेचे न्यायपीठ म्हणून ओळखले जाते.
पत्रकारिता हे अतिशय प्रभावी माध्यम म्हणून आज ओळखले जाते. समाजातील प्रत्येक सुशिक्षीत व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाची सुरूवात देखील वृत्तपत्र वाचूनच सुरू करतो. दररोज घडणा-या अनेक घडामोडीची माध्यमामधूनच सर्वांपर्यंत माहिती पोहचते. स्वतःच्या विकासासोबतच देशाच्या विकास साधण्याचे प्रभावी साधन असणा-या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाका.
मोठ्या शहरापुरते मर्यादीत असणा-या या व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी कै.आण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश (भाऊ) पोकळे यांनी वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून विशेष करून बीड जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना उपलब्ध करून देऊन होतकरू,जिद्दी व निर्भिडपणे पत्रकारिता करू इच्छिणा-या विद्याथ्र्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.

वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
+९१ ०२४४२-२२०६२१
comments