ध्येयवादी व्यक्तीमत्वःप्रो डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर)

2016-02-08 16:15:35
     1167 Views

‘समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ विचारवंत, कलावंत आवश्यक असतात. समाजाची गरज लक्षात घेवून दृष्टीप्रधान सक्षम मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी गेल्या ४० वर्षापासून अखंड प्रयत्न करणारे, विद्याथ्र्यांच्या पाठीशी खंबवीरपणे उभा राहुन वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक आणि जेष्ठ साहित्यीक तत्व व ध्येयवादी प्रोफेसर डॉ.प्रल्हाद लुलेकर (सर) यांना १० फेबु्रवारी २०१६ रोजी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै.नरहरी कुरूंदकर साहित्य पुरस्काराने आंबाजोगाई येथे सन्मानित केले जात आहे. या निमित्त प्रो.डॉ.लुलेकर यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.’

चित्रपट सृष्टीत अभिनेत्याचं देखणपन, राजकीय सृष्टीत नेत्यांचं दृष्टेपण, सामाजिक सृष्टीत सामाजिक कार्यकत्र्यांचं निखळपण, प्रशासकीय सृष्टीत प्रशासकाचे कुशल प्रशासन, साहित्य सृष्टीत साहित्यीकाच्या साहित्याचे वेगळेपण लाभनं त्या त्या सृष्टीच्या भाग्यातच असावं लागत आणि ते भाग्य नैसर्गिकच लाभलेलं असतं. व्यक्ती आपला स्वतःचा किमयागार असतो सुखापुरी ते औरंगाबाद हा प्रवास त्याचाच दृष्टांत म्हणता येईल सुखापुरी ते अंबड आणि अंबड ते औरंगाबाद हे अंतर ५०/६० कि.मी.चे असले तरी त्यातील खडतर प्रवार ६२ वर्षाचा आहे हा खडतर प्रवास देखील स्वाभाविक करून दाखवणं ही अंगभूत हातोटी असते. या अपुर्व शैलीचा पदोपदी प्रत्यय देणारे मराठवाड्यातील जेष्ट साहित्यीक साहित्य समिक्षक, परिक्षक, अभ्यासक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान परिक्षा नियंत्रक प्रोफेसर डॉ.प्रल्हाद लुलेकर साहित्य सृष्टीत, शिक्षण सृृष्टीत आणि विद्यापीठाच्या सृष्टीत प्रत्येकाला आपलेसे वाटतात.
प्रो. डॉ.लुलेकर सरांचे साहित्यीक म्हणून साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान, सामाजिक क्षेत्रात विविध विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून असणारे योगदान, आपल्या विषयावरील पकड आणि विद्यापीठ प्रशासनातील कुशल कार्यशैली, निर्णय घेण्याची क्षमता, अभ्यासपुर्ण वर्कृत्व ध्येयवादी व तत्वनिष्ठ अशा विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असणारे प्रोफेसर डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर) यांना साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै.नरहरी कुरूंदकर साहित्य पुरस्काराने शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या आंबाजोगाई येथे सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येत आहे.
साहित्यीकास साहित्य सृष्टी, शिक्षकाला शैक्षणिक सृष्टी, राज्यकत्र्यास राजकीय सृष्टी सोडून चालत नाही हे जरी खरं असले तरी साहित्य , शिक्षण, समाजकारणाच्या पहिकडे जाऊन कर्तव्याचा माणुसकीचा वेध घेणारं एक संवेदनशिल मन असते त्या मनाचा कल हाच आत्मियतेचा कौल असतो. याभूमीकेशी बांधीलकी
मानून एका ध्येयाने आणि एका तत्वाने समाजााच्या सर्वांगिण विकाससाठी शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत, साहित्यीक आवश्यक असतात ही समाजाची आणि उद्याच पिढीची गरज लक्षात घेवून आपल्या मातीतून सक्षम मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी गेल्या ४५ वर्षापासून अखंड प्रयत्न करणारे विद्यार्थांच्या, नवसाहित्यीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून वेळप्रसंगी कटूता पत्कारून सहकार्याचा हात पुढे करणारे प्रोफेसर डॉ.प्रल्हाद लुलेकर सरांनी संपूर्ण राज्यात साहित्यक्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरी या छोट्याशा खंड्यात एका सर्व सामान्य कुटूंबात डॉ.लुलेकर सरांचा जन्म झाला. आपल्या कौटूंबीक परिस्थितीवर संयमाने मात करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्वद्वितीय प्रथम श्रेणीत पद्व्युत्तर पदवी मिळवून अंबड येथील महाविद्यालयात व्याख्याता म्हणून शिक्षण क्षेत्रात सेवेला प्रारंभ केला. नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदावर सेवा स्विकारली पुढे उपकुलसचिव पदावर प्रभावीपणे कार्य केले. हाडाचे शिक्षण असल्याने सर पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळले व देवगांव (रं) येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून जबाबदारी स्विकारले पुढे पुन्हा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून रूजू झाले याच विभागात प्रोफेसर पदापर्यंत सर पोव्हचले. शैक्षणिक क्षेत्रातील भरिव योदान व कुशल प्राशासन क्षमता लक्षात घेवून डॉ. बा.आ.म.विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.चोपडे यांनी डॉ.लुलेकर सरांना विद्यापीठाच्या परिक्षा विभागाची जबाबदारी सोपविली . परिक्षा विभागाची विस्कटलेली घडी अवघ्या तीन महिन्यात बसवून ४५ दिवसात विविध परिक्षाचे निकाल आणि महिनाभरात चालणा-या परिक्षा १५ दिवसात घेण्याची किमया लुलेकर सरांच्या कुशल प्रशासनाने घडवून आनली.
प्रो.डॉ.लुलेकर सरांनी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेपासून व्यवस्थापन परिषदेपर्यंतच्या विविध समित्यांवर व कमेट्यांवर अत्यंत प्रभावीपणे कार्य केले आहे. आनेक वादग्रस्त विषय संयमाने हाताळण्याची हातोटी सरांना अवगत असल्याने अवघड प्रश्नाचे उत्तर लुलेकर सरांकडे मिळू शकते याचा विश्वास विद्यापीठ प्रशासनाला आला आहे. विद्यापीठ सेवेबरोबरच विविध शासकीय समित्यांवर सरांनी काम केले आहे. शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील योदानामुळे सरांनी विविध पुरस्काराने यापुर्वी गौरविण्यात आले आहे. विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविलेले आहे. सरांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार ही प्रदान झालेला आहे. प्रो.डॉ.लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ पीएच.डी.विद्यार्थी झाले आहेत तर २० विद्यार्थी एम.फील. झाले आहेत.
शाहु,फुले, आंबेडकर या थोर महात्म्यांच्या जिवनावर सराचे राज्यभर व्याख्याने झाले असनू राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर १५ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. सरांचे १७ ग्रंथ प्रकाशित असून सात ग्रंथाचे संपादन केले आहे. प्रो.डॉ.लुलेकर सरांच्या वाङमयीन साहित्यावर एम.फील. व पीएच.डी संशोधन सुरू आहे. प्रो.डॉ.प्रल्हाद लुलेकर सरांना १० फेबु्रवारी २०१६ रोजी अंबाजोगाई येथे सन्मानपुर्वक पुरस्कार प्रदान होत आहे त्या निमित्त मनपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा ..!

प्रा.डॉ.नामदेव सानप
वसंतराव काळे पत्रकारिता व
संगणकशास्त्र महाविद्यालय,बीड
comments