मेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला

2016-02-04 19:28:18
     967 Views

धारूर फप्रतिनिधी
धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील मेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला आहे. धुनकवाड हे गाव डोंगरपट्ट्यात आसुन या गावात सातवीपर्यंत शाळा आहे .या गावात काही शिक्षक व पोलिस हेच फक्त नोकरीला होते. पण या गावात डॉक्टर, इंजिनीअर वकील हे नव्हते. पण ज्याच्या अंगी जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आसली तर तो काहीही करू शकतो व काहीही बनु शकतो.

धुनकवाड येथील एका मेंढपाळाचा मुलगा अंकुश रामा गावडे हा चंदीगड येथे रिसर्च इंजिनीअर म्हणून काम करीत आहे.घरची परिस्थिती नाजुक वडील मेंढ्या संभाळायचे व हे चौघे भाऊ पण तेही अशिक्षित पण अंकुशनी जिद्द केली. की, आपल्या गावात इंजिनीअर, डॉक्टर, वकील हे कोणी नाही तर आपण इंजिनीअर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी त्याचे स्वप्न साकार केले व धुनकवाड येथील युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अंकुशचे प्राथमिक पहिली ते सातवी शिक्षण धुनकवाड येथे जिल्हा परिषद शाळेत झाले.आठवी ते दाहवी माध्यमिक विद्यालय तालखेड येथे झाले व नंतर अकरावी, बारावी केएसके महाविद्यालयात व सीईटी ही बीड येथेच झाले.व नंतर त्याला चंदिगढ येथे पेपर केमिकल कंपनीत रिसर्च इंजिनीअर म्हणून काम करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ही जिद्द, चिकाटी आसल्यावर उंच शिखरावर जाऊ शकतो. घरात वडील, भाऊ कोणीही शिकलेले नसताना व एका मेंढपाळाच्या मुलाने स्वत:हाच्या मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याला हे शिखर गाठता आले. त्याचे वडील, भावाने ही त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही.व धुनकवाड येथील एका मेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला आसल्याने या डोंगरपट्ट्यातील युवका समोर त्याने एक आदर्श निर्माण केला आसुन परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

अन ... त्यांना गहीवारून आले
धुनकवाड येथील अंकुश गावडे हा मेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाल्याने ही गावक-यांसाठी आभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणून एका कार्यक्रमात त्यांचे वडील रामा गावडे यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी त्यांना बोलावण्यात आले पण त्यांना काही कळेनासे झाले भोळे भाबडे वयोवृद्ध रामा दादा त्यांना सांगितले की तुमचा मुलगा अंकुश इंजिनीअर झाला आसल्याने तुमचा सत्कार होत आहे. आसे म्हणताच रामा दादाला गहिवरून आले.
comments