हरितक्रांती ते जलक्रांती व्हाया जलयुक्त शिवार योजना

2015-08-01 13:27:22
     1140 Views

‘महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्य आणि वसंतराव नाईक यांचे हरित क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या समृद्ध कल्पनेतून साकार झालेली जलयुक्त शिवार योजना एकीकडे पुरेसी ठरत आहे तर दुसरीकडे पाणि टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर रामबाण उपाय ठरू लागली असतांनाच ना.मुंडे यांच्या जलयुक्त शिवार योजना या महत्वाकांक्षी योजनेचा आदर्श राजस्थानच्या मुख्यमंत्री वसूंधरा राजे यांनी घेवून वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जाणा-या राजस्थानला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री वसुंधरा राजे पाहू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशातील अन्य दुष्काळग्रस्त राज्य सुद्धा जलयुक्त शिवार योजना राबविण्यास उत्सुक आहेत त्यामुळे ना.पंकजा मुंडे यांचा हा प्रकल्प देशासाठी वरदान ठरणारा आहे’
महाराष्ट्र राज्यातील शासन आणि प्रशासनाच्या इतिहासाचे पाने चाळले असता राज्याच्या ५५ वर्षाच्या कार्यकाळात शासन प्रशासन आणि विकास यांची सांगड घालून सामुहिक विकासाचे चक्र गतीमान करण्याचे कौशल्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच शासन कत्र्यांना जमल्याचे आढळते. ज्या शासन कत्र्याना हे कौशल्य अवगत झाले तेच शासनकर्ते महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटू शकले त्यात महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बँ. ऐ.आर. अंतुले, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, या शासन कत्र्यांचे कार्य राज्याच्या कायम स्मरणात राहणारे आणि राज्याच्या सामुहिक विकासाला गतीमान करणारे ठरले.
महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी कृषी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून नव्या कृषी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. कृषी पुरक सहकार चळवळीचे बिजारोपन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत वसंतदादा पाटील यांनी राज्यात कृषी पुरक सहकारी साखर कारखानदारीसह अन्य कृषी उद्योगांना पाठबळ देवून सिंचनावर भर दिला वसंतराव नाईक यांनी आपल्या काळात यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्रचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात नव्या ध्येयाने हरित क्रांती घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवे ज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोव्हचविण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठ, कृषी शिक्षण, सिंचनाच्या धडकयोजना राबविल्या शंकरराव चव्हाण यांनी राज्यात कृषी विकासाचे महत्व व गरज ओळखून विविध जलप्रकल्प, सिंचनप्रकल्प उभारले व लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आनली. बॅ.ऐ.आर अंतुले यांनी शेतक-यांसाठी छोट्या छोट्या विविध योजना राबविल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचार सरणीचा प्रभाव असणा-या शरद पवार यांनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्य निर्मीतीसाठी आणि विशेष कृषी विकासासाठी सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी पाटबंधारे खात्याद्वारे राज्यात विविध सिंचन प्रकल्प उभारले, सहकारी साखर उद्योगाला पाठबळ दिले. शेतक-यांसाठी आधारवड ठरणारी धडक फळबाग योजना धडक. जवाहर विहीर योजना, शेतक-यांना आधार देणारी कर्जमाफी योजना राबविल्या. सुधाकरराव नाईक यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांचे कृषीविकासाचे धोरण नव्याने राबवून कृषी विकासाच्या धडक योजना कार्यान्वित केल्या. विलासराव देशमुखांनी वरिल सर्व थोर नेत्यांच्या कृषी विकासाच्या योजनांना पाठबळ देवून पुढे चालू ठेवल्या व नव्याने कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणारी साखळी बंधारे योजना राबवून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला राज्यातील सत्तेची सुत्रे अल्पकाळ हाती असतांना गोपीनाथराव मुंडे यांनी कृषी उत्पनांना अधीक भाव मिळवून देण्या बरोबरच कृषीपूरक साखर उद्योगाला नवसंजिवनी दिली. त्यामुळे झोन बंदीमध्ये अडकलेला ऊस उत्पादक शेतकरी मुक्त झाला. या बरोबरच अन्य कृषीपुरक उद्योग उभारणीवर भर देवून कृषी विद्युतीकरणाचे जाळे विनले.
राज्याच्या ३३ वर्षाच्या कार्यकाळात सुजलाम सुफलाम महाराष्ट्र उभारणीसाठी विविध स्तरावर प्रयत्न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्य व इतर कृषी उत्पानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले कृषी उत्पादन निर्यातिकरू शकले असले तरी गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यवृष्टीच्या असमतोलामुळे राज्यातील आनेक भागात दुस्काळदृष्य परिस्थिती निर्माण झाली. दरवर्षी अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे ६०० फूट खोलपर्यंत पाणिपातळी गेल्याने राज्यातील आनेक भागात पाणि टंचाई, चाराटंचाई निर्माण झाली एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे स्थलांतर होऊ लागले, लोक पाण्याच्या शोधात राणोमाळ भटकु लागले. शेतकरी कर्जबाजारी झाला. राज्यातील मराठवाडा विदर्भ व राज्याच्या उर्वरित भागात दरवर्षी दुस्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असंख्य तालुके टंचाईग्रस्त म्हणून शिक्कामोर्तब झाले. शेतीउत्पन्न घटल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आनेक भागातील शेतक-यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्या दरवर्षी होणारी अल्प अल्प पर्जन्यवृष्टीमुळे दरवर्षी पडणारा दुस्काळ निर्माण होणारी पाणि चारा टंचाई यांच्या मुळाचा शोध घेत पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जिरवला तरच भुुगर्भातील पाणि पातळी उंचावेल व पाणि टंचाई आणि चारा टंचाईवर मात करता येईल या आत्मविश्वासाने राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणुन प्रथमच जबाबदारी सांभाळण्याचा ना.पंकजाताई मुंडे यांनी, राज्यातील विविध भागाच्या बेसीक विकासाची नाडी ओळखून ‘सर्वांसाठी पाणि’ हे ब्रीद घेवून ‘जलयुक्त शिवार योजना’ आखली ही योजना अल्पअल्प काळात कार्यान्वित करून राज्यातील दुष्काळी परिस्थितीला कायमची मुठमाती देण्याचा निर्धार केला, महाराष्ट्रातील वाडी वस्ती पर्यंतच्या माणसापर्यंत या महत्वकांक्षी प्रकल्पाचे महत्व मनावर रूजविले. ना.पंकजाताईच्या जलयुक्त शिवार योजनेतून जलसिंचन क्रांती घडून येणार असल्याचा विश्वास लोकमनात निर्माण झाला आणि पाहता पाहता या महत्वकांक्षी प्रकल्पास लोकाश्रय मिळाला. ना.पंकजातार्इंच्या नेतृत्वाखाली थेट जलयुक्त शिवार योजनेचे कामे युद्ध पातळीवर सुरू झाले पहिल्याच पावसात ठिक-ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारे पाणी साठे दिसू लागले.
मराठवाड्याचा दिवसेंदिवस होत असलेला वाळवंट आणि दरवर्षी निर्माण होणारी पाणि टंचाई व दुुस्काळी परिस्थिती यावर जलयुक्त शिवार योजनारामबाण उपाय ठरणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मराठवाड्यातून पाणिटंचाई आणि दुस्काळ या प्रश्नांना कायमची मुठ माती देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा प्रकल्प धडक योजनेद्वारे आगामी दहा वर्षे राबविण्याचे नियोजन झाले तर मराठवाडा ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम होणार यात शंका नाही.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात मराठवाढ्यातील १६८२ गावांची निवड करण्यात आली. त्या गावात २६२२२ पाणि सिंचनाचे कामे करण्याचे उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आले निवड करण्यात आलेल्या ह्या गावापैकी १५९० गावात जुन २०१५ पर्यंत १५५४४ जलसिंचनाचे कामे पुर्व झाले आहेत तर १०६७८ जलसिंचनाचे कामे प्रगतिपटावर आहेत. या कामात पाणलोट क्षेत्र विकास नद्या-नाले खोलीकरण व रूंदीकरण सखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधारे ओढे नाले जोड प्रकल्प, विहीर, विंधन विहीर जलपुर्नभरण, पाण्याच्या सिंचनाचे स्त्रोत बळकट करणे इत्यादी प्रकल्पाचे कामे हाती घेण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मराठवाढ्यातील आठ जिल्ह्यात जिल्हानिहाय कामे औरंगाबाद १७५९ जालना १५२३ बीड ५८९ परभणी १६९१ हिंगोली १५६८ नांदेड २१९२ लातूर १७७० उस्मानाबाद ४४५२ या पैकी १५५४४ कामे पूर्ण झाले आहेत तर १०६७८ एवढी कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात सर्वाधिक कामे मराठवाड्यातील वाळवंट प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा-या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसिंचनाचे कामे हाती घेण्यात आले आहेत त्यांची संख्या ३३७८ आहे त्या नंतर परभणी जिल्ह्यात २०३१ कामे आहेत उर्वरित जिल्ह्यात प्रगती पथावर असणारे कामे औरंगाबाद १६०४ जालना १२२० बीड ६७३ हिंगोली ८४ नांदेड ९३२ लातूर ६५६. आहेत.
मराठवाड्यासाठी वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार अभियान योजनेसाठी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेवर राज्य शासनाने २८० कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्याचे पहिल्या टप्यात निधी देण्यात आला आहे तर श्री सिद्धी विनायक ट्रस्ट मुंबई कडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर एककोटी रूपये खर्च करणार आहे त्याबरोबरच श्री साईबाबा संस्थान शिर्डी द्वारे ही प्रत्येक जिल्ह्याला एक कोटीचा निधी देण्यात आला आहे. आजपर्यंतच्या अभियानावर खर्चासाठी एकूण २९६ कोटी ५२ लाख रूपये निधी प्राप्त झाला.
मराठवाड्यातील विविध प्रकल्पातील गाळ काढणे पाणि आडवून जिरविणे व पाणी पातळी वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हयातील १६८२ गावांमध्ये १९१६ विविध प्रकल्पांची संख्या आहे. या पैकी लोकसहभागातून ९६१ प्रकल्पातील तर २१७ प्रकल्पातील शासकीय यंत्रनेद्वारे गाळ उपसण्याची मोहीम राबविण्यात आली. लोकसहभाग व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ११६३ प्रकल्पातून १ कोटी ६४ लाख ३७ हजार ५२१ घनमीटर गाळ काढण्यात आला त्यात लोकसहभागातून केलेल्या कामाचे शासकीय मुल्य ९८ कोटी १४ लाख होते. याद्वारे १ कोटी ३६ लाख ३० हजार ९०५ घनमिटर गाळ वाढण्यात आला.जलयुक्त शिवार अभियान या योजनेचे महत्व सर्वसामाण्य मानसांना पटवून दिल्यामुळे या योजनेस उदंड असा लोकसहभाग मिळाला, या योजनेते गांभिर्य लक्षात घेवून राज्य शासनाने या योजनेला महत्व दिले.
दिवसेंदिवस पर्जन्यवृष्टी कमी होतचालल्याने नद्या नाल्यांचे अस्तीत्व संपूष्ठात येऊ लागले होते या नद्या नाल्यांना पुन्हा प्रवाहीत करणे त्यांचे पुर्नरूजिवन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला यामध्ये नद्या नाल्यांचे खोलीकरण बरोबरच ठिकठिकाणी माती व सिमेंट बंधारे उभारण्यामुळे ओसाड झालेल्या नद्या नाले पाण्याचा साठ्यामुळे भरभरून वाहू लागले आहेत या उपक्रमामुळे जमीनीतील पाणिसाठा वाढल्यास मोठी मदत होत आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या पाहिल्या टप्यातील कामासाठी राज्यशासनाने सुमारे एक हजार कोटी रूपयाची तरतुद केली आहे. तर लोकसहभागातून २३५ कोटी रूपयाचा निधी उभा राहिला जलयुक्त शिवार योजना या महत्वकांक्षी प्रकल्पाद्वारे झालेल्या कामांचे यश लक्षात घेवून राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधराराजे यांनी वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा-या राजस्थानला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी महाराष्ट्रराज्यातील जलयुक्त शिवार योजना राजस्थान राज्यात राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी राजस्थानचे उच्चस्तरिय अभ्यास मंडळाने महाराष्ट्र राज्यात येऊन थेट ना.पंकजा मुंडे यांची भेट घेतली आगामी काळात ना. पंकजा मुंडे यांची जलयुक्त शिवार योजना देशासाठी आदर्श ठरणार असल्याचे हे संकेतच आहेत.
राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या कल्पनेतून साकार होत असलेली जलयुक्त शिवार योजना जलक्रांती कडे घेवून जाणारी ठरली आहे. पहिल्या टप्यात पुर्ण केलेल्या कामोच यश भरभरून वाहणा-या नद्या-नाले बंधा-याद्वारे दिसू लागले आहे. जलयुक्त शिवार ही योजना जलक्रांतीच्या दिशेने घौडदौड करित आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आणि वसंतराव नाईकांचे हरित क्रांतींचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणारी ठरू लागली आहे यात शंकाच नाही.

प्रा.डॉ.नामदेव सानप
९४२१५७३९३३
comments