लोकनेते यशवंतराव ते गोपीनाथराव

2015-06-03 18:51:30
     1122 Views

दिवंगत भा.ज.पा.जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना.गोपीनाथरावांचे नेतृत्व, चौफेर स्वरूपाचे होते, त्यांच्या व्यक्तीमत्वात नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा त्रिवेणी सोनेरी संगम घडून आला होता. त्यांनी संघर्षाची आणि चळवळीची जी शिदोरी महाराष्ट्राला दिली ती राज्यातील समाजकारणाला आणि राजकारणाला दिर्घकाळ प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे ठरणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात यशवंतराव चव्हाण साहेबांनंतरचे दुसरे लोकनेते ठरले आज गोपीनाथरावांचा पहिला स्मृती दिन त्या निमित्त त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आढावा घेणारा हा लेख.
महाराष्ट्र राज्यातील समाजकारण आणि राजकारणाच्या इतिहासाचे पाने चाळले असता राज्यातील समाजकारणाची आणि राजकारणाची वाटचाल ही अनेक चढउतारावरून झालेली आढळते. या अनेक चढउताराच्या वाटचालित ही काही राजकीय नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा राज्यातील समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या पटलावर अविस्मरणिय असाच उमटविला. त्यात राज्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,बॅ.अ.र.अंतुले, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे, या दिवंगत नेत्यांचे कार्य राज्याच्या कायम स्मरणात राहणारे ठरले.
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करून राज्यात सहकार चळवळ रूजविली, पंचायतराज योजना सुरू केली. वसंतदादा पाटील यांनी सहकार चळवळ गतीमान करून तंत्र शिक्षणाची वाट मोकळी केली. वसंतराव नाईकांनी राज्यात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी ठोस पावले उचलली. शंकरराव चव्हाण यांनी राज्याची आर्थीक घडी बसविण्यासाठी शून्य अर्थसंकल्पाचा आणि विविध सिंचन प्रकल्प उभारण्याचे धाडसी निर्णय घेतले. बॅ.अ.र.अंतुले यांनी गोर गरीबांसाठी अनेक योजना राबविल्या सुधाकरराव नाईक यांनी राज्याकत्र्यांना शिस्त लावली व राजकारणात नव्या चेह-यांना संधी दिली. विलासराव देशमुखांनी आघाडी सरकारचा यशस्वी पॅटर्न राबवून राज्याला विनाअनुदान आणि केंत्राटी धोरणाची देणगी दिली तर गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील अठरापगड जाती जमातींसाठी सत्तेची आणि भा.ज.पा.ची दारे खुली केली. खाजगी साखर उद्योगाची मुहर्तमेढ रोवली. समाजकारण आणि राजकारणातील गुन्हेगारी मोडीत काढली. या थोर दिवंगत नेत्यापैकी केवळ बोटावर मोजण्या एवढयाच नेत्यांना महाराष्ट्राचे लोकनेते (मासबेस लिडर) होता आले त्यापैकी गोपीनाथराव यांचे नेतृत्व अविस्मरणीय आणि संघर्षशिल असेच ठरले.
दिवंगत भाजपाचे जेष्ठ नेते तथा केंद्रिय ग्राम विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे कणखर आणि पोलादी व्यक्तीमत्व होते त्यांची स्वतंत्र विचारसरणी आणि भूमीका होती. सत्तेची फळ समाजातील अठरापगड जाती जमातीच्या अखेरच्या घटकाला चाखता आली पाहिजेत सत्तेचा झरा अखेरच्या घटका पर्यंत पोहचला पाहिजे अशी त्यांची धारणा होती या ध्येयानेच त्यांनी महारष्ट्र ढवळून काढला राज्यातील वाडी -वस्ती पर्यंत जाऊन लोकांना समाजकारण आणि राजकारणाचे धडे दिले सत्ताम्हणजे काय यांचे महत्व पटवून दिले लोकभावनांशी एकरूप झाल्यामुळे ते महाराष्ट्राचे लोकनेते होऊ शकले.
एका विचाराने व भूमीकेने राजकारणात ४० वर्षे प्रस्तापितांच्या विरूध्द त्यांनी सघर्ष केला. संकट समई संकटग्रस्तांना ते सरकारी नव्हे तर व्यक्तीगत स्तरावरून मदत करित असत त्यामुळे राज्यकत्र्यांवर गोपीनाथरावांची कायम आदरयुक्त दबाव निर्माण झाला होता. काळ, वेळ आणि प्रसंग साधून ते सत्ताधा-यांवर धावून जात तेंव्हा सत्ताधा-यांना पळताभूई थोडी होत असे समाजकारण आणि राजकारणात गोपीनाथरांवांची प्रतिमा स्वच्छ होती. भूमीका रोख ठोक होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत एकही राजकीय विरोधक त्यांच्यावर आरोप करू शकला नाही.गोपीनाथराव राज्याच्या हितासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यकत्र्यांवर सर्वताकदीने धावून जात जेंव्हा सत्ताध-यांना चार पावलं मागे जावा लागत असे.
राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर गोपीनाथरावांनी अक्षश: राणपेटविले होते. गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या संघर्षाची आणि चळवळीची जी शिदोरी महाराष्ट्र राज्याला दिली ती राज्यातील समाजकारणाला आणि राजकारणाला दिर्घकाळ प्रेरणा आणि प्रोत्साहन देत राहणारी आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात जनसामांन्याचे सरकार यावे हे स्वप्न पाहिले मुंडे साहेबांचा संघर्ष आणि सेना - भाजपा युती यांचे फलीत म्हणजे राज्यातील १९९५ आणि २०१४ चे सत्तांतर होय. परस्परांच्या सहकार्याने आणि परस्परांच्या समंजस्य भूमीकेद्वारे चालविलेला कारभारच लोकाभिमुख राज्यकारभार होय या सकारात्मक भुमीकेमुळे आणि कार्यपध्दतीमुळे गोपीनाथरावांची राजकीय कारकीर्द प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी ठरली. शासन प्रशासन प्रणाली बद्दल त्यांनी नेहमी मुलभुत व सकारात्मक विचार केला. शासन प्रशासन यांच्या सुरेख संगमातूनच राज्याचा सामुहिक विकास साधला जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वास होता त्यामुळे सत्तेबाहेर राहूनही प्रशसनावर त्यांची छाप होती.सर्वांगिण उत्कर्ष, सामाजिक न्याय समतोल विकास, सत्ताकेंद्राचे विकेंद्रिकरण आणि अठरापगड जातींचा उत्कर्ष याला गोपीनाथरावांनी केंद्रबिंदू मानले. राज्याचा आणि तळागळातील व्यक्तीचा विकास परिवर्तना शिवाय अशक्य आहे हे लक्षात घेवून त्यांनी अखंड समाजप्रबोधन आणि समाजशिक्षणासाठी चळवळ उभारली समाजकारण आणि राजकारणा बोरबरच कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, संस्कृती, कला, साहित्य, अशा जीवनाच्या विविध क्षेत्रावर त्यांची छााप होती समतोलराजकारण कुशल मुत्सद्दी, व्यव्हारचतूर, कुशलप्रशासक, साहित्य रसिक, उत्तमवक्ता, कलारसिक, तत्वचिंतक आणि कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी बहारलेले समृध्द नेतृतव होते.गोपीनाथरावांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व चौफेर स्वरूपाचे होते. त्यांना पाहिलं ,ऐकलं,अनुभवलं की प्रत्येक व्यक्ती त्यांचा दिवाना होत असे त्यामुळे गोपीनाथराव महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात यशवंतराव चव्हाण नंतर दुसरे लोकनेते अविस्मरणीय ठरले.
सहकार चळवळ या विषयाचा गाढा व्यासंग गोपीनाथरावांना होता त्यांच्या मते सहकार क्षेत्राद्वारे ख-या अर्थांने परस्परांचा परस्परांच्या सहकार्यातून उत्कर्ष घडून येऊ शकतो तर चळवळीद्वारेच ख-या अर्थाने सबंध समाजाचे समाज प्रबोधन होऊ शकते आणि त्याद्वारेच सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकते या ध्येयाने गोपीनाथरांनी सहकार क्षेत्रातील सहकारी साखर उद्योगाला नवसंजिवनी मिळवून दिली तर संघर्ष चळवळी द्वारे विविध विषयावर प्रभावी जनजागृती केली त्यामुळे गोपीनाथराव आणि संघर्ष चळवळ हे राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणत एक सुत्र तयार झाले होते. साखर उद्योगावर गोपीनाथरावांचे विशेष लक्ष होते. या उद्योगाबाबत बोलतांना ते म्हणत साखर कारखान्यांकडे मी एक उद्योग म्हणून पाहत नाही तर या उद्योगात शेती-शेतकरी, शेतमजुर आणि कृषी व ग्रामिण विकास दडलेला आहे. ग्रामीण विकासाचे ग्रामीण जनतेच्या उत्कर्षाचे साखर कारखानदारी एक मुलभूत साधत आहे.या उद्योगात ग्रामीण भागाची आर्थीक नाडी दडलेली आहे अशी भूमीका त्यांची होती.
राज्यातील साखर उद्योग ऊस उत्पादक शेतकरी आणि उसतोड मजुर यांच्यात समन्वय साधुन सहकारी साखर उद्याोगात आमुलाग्र बदल करून हा उद्याोग गतीमान केला. राज्यातील २७ सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत निघालेले स्वत: सक्षमपणे चालवून ते साखर कारखाने पुर्वस्तराव आणण्याची किमया मुंडे साहेबांनी घडवून आणली एवढेच नव्हे तर साखर उद्योगातील साखर सम्राटांच्या लॉबीला विकासात्मक शह देण्यासाठी मुंडे साहेबांनी राज्यात खाजगी साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली मुंडे साहेबांच्या या दुरदृष्टी प्रकल्पामुळे साखर सम्राटांच्या जबड्यात अडकलेला शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार मुक्त झाला. आजही हा उद्योग यशस्वीरित्या घौडदौड करित आहे मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात ३३ खाजगी साखर उद्योगाची एक नवी फळी उभी राहिली साखर उद्योगात मुंडे साहेबांनी नव्या तंत्रज्ञनाचा स्विकार केला. त्यामुळे अनावश्यक खर्चावर मात करता आली. साखर उद्योगाचे प्रणेते ठरलेल्या उद्योगाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आपले भरिवयोगदान दिले साखर उद्योगाला नवसंजिवनी त्यांनी दिली. यावरून गोपीनाथरावांचा साखर उद्योगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोण किती मूलभूत व दुरदृष्टीचा आणि सामूहिक विकासाचा होता हे लक्षात येते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे शैक्षणिक क्षेत्रावर खास प्रेम होते शिक्षण हीच मानवी आणि राष्ट्रीय विकासाची पहिली पायरी आहे ही त्यांची भूमीका होती त्यामुळे त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, माध्यमीक शाळा, महाविद्यालये सुरू केली. संख्यात्मक शिक्षण देण्यापेक्षा गुणात्मक शिक्षण द्यावे यावर त्यांचा भर होता. राज्याचे उपमुख्यमंत्री असतांना त्यांनी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उर्दू भाषाचा पद्व्युत्तर पदवी विभाग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स शिक्षण संस्थंच्या औरंगाबाद येथील महाविद्यालयास सात कोटी रूपयांचा निधी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी स्वत:हून दिला मुंडे साहेबांची सामाजिक समतेवर दृढ निष्ठा होती हेच यावरून सिध्द होते.
क्रीडा क्षेत्राविषयी मुंडे साहेबांना ओढ होती. आपल्या मातृभ्ूमीत क्रीडा क्षेत्राचा विकास झाला पाहिजे ही त्यांची धारणा होती युवकांनी क्रीडा क्षेत्रकडे वळावे त्यांचे लक्ष क्रीडा क्षेत्राकडे वेधावे यासाठी मराठवाड्याची राजधानी असणा-या औरंगाबाद शहरात अखिल भारतीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धा भरविल्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दुर असणा-या घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी मंडल आयोगाच्या अमलबजावणीसाठी त्यांनी खुली भूमीका घेवून मंडल आयोगाला पाठींबा दिला मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारण्यात याव्यात व मंडल आयोग लागू करावा या संदर्भात विधानसभेत त्यांनी केलेले भाषण तसेच केंद्रातील यु.पी.ए.सरकार असतांना लोकसभेतील भाजपा उपनेते म्हणून देशातील ओबसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगनना कशी आवश्क आहे या संदर्भात केलेले भाषण दिर्घकाळ स्मरणात राहणारे आहे.
राजकीय दृष्ट्या मतांच्या वजाबाकीचा विचार न करता मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे व्हावे यासाठी नामांतराच्या चळवळीत पाठींबा दिला. नामांतरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला स्वत: सामोरे गेले आणि सामाजिक परिस्थिती नामांतरात अनुकल केली. मराठवाड्याच्या विकासाचा अनुषेश भरून काढला पाहिजे मराठवाड्यातील शैक्षणिक, दळणवळण औद्योगिक, आरोग्य , सिंचन आदी समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी मराठवाडा लोकविकास आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला . राजकारणातील गुन्हेगारी, मुंबईतील टोळी गुन्हेगार तयांनी धाडसाने मोडीत काढली.एवढेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारी आणि मुंबईतील गुन्हेगारीचे कर्दनकाळ मुंडे साहेब ठरले.
समाजकारण व राजकारणाच्या पलिकडे पाहण्याच्या दृष्टीकोणामुळे विविध क्षेत्रातील योगदानामुळे मुंडे साहेब आपला ठसा विविध क्षेत्रात उमटवू शकले . मराठवाडा हा भाग कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो दुष्काळावर कायम उपाय शोधता येईल काय यासाठी परळी येथे दुस्काळ परिषद आयोजित केली एवढेच नव्हे तर आपली मातृभाषा अधिक सक्षम व प्रभावी व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलन भरविले . शेतकरी शेतमजूर यांच्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नागपुरच्या विधानभवनावर प्रचंड असा ऐतिहासीक महामोर्चा काढला, शिवनेरी ते शिवतिर्थ आणि अक्कलकोट ते नागपूर अशा दोनवेळा संघर्ष यात्रा काढून राज्यातील जनतेला जागृत करत सरकारला पळताभुई थोडी केली अतिवृष्टीमुळे उभेसंसार आणि शेतजमीन वाहून गेलेल्या गोदावरी काठच्या शेकडो गावांना भेटी देवून आपदग्रस्तांना आधार मिळवून देण्यासाठी गोदापरिक्रमा१ काढली. आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीला अभ्यासपूर्ण माहितीची जोड दिल्याने मुंडे साहेबांचा जनसंवाद हा परिणामकारक ठरत असे.
आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी गोपीनाथराव धावून जात असत. समाजकारणाती आणि राजकारणातील गुन्हेगारी संपूष्टात आण्यासाठी, समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करण्याचा आणि सत्तेतील भ्रष्टाचार नष्ट करण्याचा त्यांनी विडा उचलेला होता. साहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड करून अपप्रवृत्तींना पाठीशी घातले नाही व अप्रत्येक्ष राजकीय अथवा सामाजिक गुन्हेगारांचे पुनर्वसन केले नाही. आज राज्यात युतीचे सरकार सत्तेत आहे हे सरकार येण्यासाठी मुंडे साहेबांची १५ वर्षाची मेहनत आहे, साहेबांच्या आत्म्यास शंती लाभावी असाच राज्यकारभार तमाम मुंडे समर्थकांना अपेक्षीत आहे.
समाजकारण आणि राजकारणासह विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि भुमिका लक्षात घेतल्या तर दिवंगत भाजपा जेष्ठ नेते तथा केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर लोकनेते तथा महाराष्ट्रराज्याचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रभाव होता. सभागृहाची जान आणि महाराष्ट्राची शान झालेल्या गोपीनाथरावांचा राजकीय प्रवास हा खडतर राहिला, खडतर प्रवासाला जनमताची जोड देण्याचे भाग्य साहेबांना लाभले त्यामुळेच लोकनेते यशवंतराव चव्हाण नंतर राज्यात लोकनेता होण्याचे भाग्य ही गोपीनाथरावांना लाभले परळी तालुक्यातील नाथ्रा येथे गोपीनाथरावांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ ला एका शेतकरी कुटूंबात झाला. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांनी राजकीय सत्तेत केला. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री या पदावर असतांना ३ जुन २०१४ रोजी दिल्लीत कार अपघात झाला तो दिवस साहेबांच्या आयुष्यासाठी शेवटचा ठरला. आज ३ जुन साहेबांची पाहिली पुण्यतीथी त्या निमित्त त्यांच्या स्मृतीस विन्रम आदरांजली !

प्रा.डॉ.नामदेव सानप
वसंतराव काळे महा.बीड
मो.९४२१५७३९३३
comments