गोपीनाथराव मुंडे काल ,आज,उद्या ,पंकजाताई मुंडे आज,उद्या आणि परवा

26/08/2014 3 : 0
     748 Views

ज्यांच्या नावात आणि व्यक्तीमत्वात अख्खा महाराष्ट्र सामावलेला आहे. महाराष्ट्र राज्याचं काल,आज आणि उद्याचं समाजकारण, राजकारण आणि परिवर्तन दडलेलं आहे. ज्यांच्यावर आज ही लाखो नव्हे तर करोडो लोक उदंड प्रेम करतात ते एक नाव आणि व्यक्ती म्हणजे लोकनायक भा.ज.पा. जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्व.ना.गोपीनाथराव मुंडे साहेब होय! तसंच दुसरं एक नाव ज्या नावात मुंडे नावाची जादुई किमया सामावलेली आहे, त्याबरोबरच आपल्या संवाद आणि संपर्काने अत्यअल्प काळात संपूर्ण महाराष्ट्राला
मोहिनी घालून महाराष्ट्राच्या राजकीय कुरूक्षेत्रावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.राज्याचं राजकीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या बारामतीत जाऊन आपल्या नेतृत्वाचे हादरे देणा-याअ, तमाम मुंडे साहेबांच्या समर्थकांना एक आशेचा किरण वाटणा-या, मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी घ्सिंदखेड ते चौंडी संघर्ष यात्रेच्या निमीत्ताने महाराष्ट्रात परिवर्तनाच्या मोहिमेवर मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंडे नावाच्या दुस-या पर्वास प्रारंभ करित आहेत. आपल्या नेतृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या मनामनावर आज, उद्या आणि परवा उमटविणारी दुसरी व्यक्ती म्हणजे भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ.पंकजाताई मुंडे होय !! आज भाजपा नेत्या आ.पंकजाताई मुंडे यांच्या सिंदखेड ते चौंडी या संघर्ष यात्रेचा प्रारंभ होत आहे त्या निमित्त हा लेख.
असं म्हणतात की, नावात काय असतं ? व्यक्तीत काय असतं? परंतु नावात आणि व्यक्तीमध्येच सर्व काही दडलेलं असतं ! असंच एक नाव आणि एक व्यक्ती ज्यांच्या नावात आणि व्यक्तीमत्वात अख्खा महाराष्ट्र समावलेला आहे आणि महाराष्ट्राचं काल आज आणि उद्याचं समाजकारण, राजकारण आणि परिवर्तन दडलेलं आहे. जे नाव जी व्यक्ती महाराष्ट्रातील लाखो नव्हे तर कराडो जनतेच्या -हदयात काल घर करून होती आज घर करून आहे आणि उद्या ही घर करून राहणार आहे. ते नाव आणि ती एक व्यक्ती म्हणजे भा.ज.पा. जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्व.ना.गोपीनाथराव मुंडे होय. तसचं दुसरं नाव आणि ज्या व्यक्तीनं आपल्या संवाद आणि संपर्काने अत्य अल्प काळात संपूर्ण महाराष्ट्राला मोहीणी घातली आणि आज महाराष्ट्र राज्यातील लाखो जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलं. जनसामांन्यांना आज आधार वाटलागली उद्याचा आशेचा किरण वाटू लागली परवाचं खंबीर नेतृत्व वाटूलागली ती व्यक्ती म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आ.पंकजाताई मुंडे होय.
राज्यस्तरीय पातळीवर बीड जिल्हा म्हटलं की, महाराष्ट्रातला बीहार म्हणून ज्या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो त्याच जिल्हयातील याच पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणारे नेते, उच्च अधिकारी, पदाधिकारी, न्यायमुर्ती दिले आहेत हे विशेष! बीड जिल्ह्याने असाच एक लढवय्य आणि संघर्षशिल जननेता दिला. तो नेता आज महाराष्ट्राच्या सोबत, बीड जिल्ह्यासोबत प्रत्यक्ष नसला तरी त्या नेत्यांचे अस्तित्व आणि प्रभुत्व काल आज आणि उद्या ही केवळ बीड जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक कुरूक्षेत्रावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक कुरूक्षेत्रावर कायम राहणार आहे. कारण भाजपा जेष्ठ नेते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्व.ना.गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावातील अठरा पगड जाती धर्माचे लोक आपल्या दिलदार आणि दिलखुलास व्यक्तीमत्वाशी समाजकारण आणि राजकारणातील संघर्षातून तन मनाने जोडले जी व्यक्ती स्व.ना.गोपीनाथराव मुंडे यांना भेटत असे, पहात असे, त्यांना ऐकत असे ती प्रत्येक व्यक्त्ी मुंडे साहेबांचा दिवाना होत असे. आपल्या जादुई व्यक्तीमत्वामुळे प्रभावी वकृत्वामुळे अशक्य ते शक्य करणा-या कर्तृत्वामुळे आणि दिशा देण्याची क्षमता असणा-या नेतृत्वगुणामुळे ४५ वर्षाच्या समाजकारण आणि राजकारणच्या कारकिर्दीत सत्तेबाहेर राहून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील लाखो नव्हे तर करोडो लोकांची मनं जिंकली.
१९८० च्या विधानसभा निवडण्ुकीत विजय प्राप्त करून मुंडे साहेबांनी विधानसभ्ेत प्रवेश केला स्वतंत्र महाराष्ट्र राज्यनिर्मीती पासून महाराष्ट्राच्या सत्तेवर समाजकारणावर आणि राजकारणावर सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधा-यांनी कायम आपली पकड ठेवली उर्वरित महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली ही बाब मुंडे साहेबांना खटकत होती. पश्चिम महाराष्ट्राने उर्वरित महाराष्ट्राला विकासाचे समन्यायी वाटा द्यावा या ध्येयाने मुंडे साहेबांनी राज्याच्या राजकारणास प्रारंभ केला. पुढे १९८४-८५ मध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रातून ४२ आमदार निवडून आणले. आपल्या संघर्षाच्या, व वकृतत्वाच्या आणि कतृत्वाच्या बळावर विधानसभेत त्यांची भाजपा गटनेते पदी निवड झाली आणि गोपीनाथराव मुंडे यांनी ख-या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेची, समजाकारणाची आणि राजकारणची दिशा बदलून टाकण्याचा विडा उचलला.
महाराष्ट्र राज्याची राजधानी असण-या मुंबई शहरातील संघटीत गुन्हेगारी, राज्यकत्र्यांचे गुन्हेगारी जागताशी असणारे हितसंबध जे जे हव्याकांड, कामगार नेत्यांच्या हत्या, मुंबईतील साखळी बॉम्बस्पोट, १९९२ ची मुंबई दंगल, आदिवाशींचे प्रश्न, राज्यातील कपोषीतांचे बळी, भ्रष्टाचार, दोभोळ एन्रॉना विज प्रकल्पातील भ्रष्टाचार, सत्ताधा-यांचे आणि राजकीय नेत्यांच्या पुत्रांचे सेक्स स्कॅडल, तेलगी मुद्रांंक पेपर घोटाळा, कोळसा घोटाळा, मेळघाट प्रकल्प, राज्यातील कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या, खुन दरोडे महिलांवरिल बलात्कार वीज टंचाई, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, गारपीट, दुस्काळ, अतिवृष्टी, टोल वसुली, या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, सुधाकरराव नाईक, अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण सरकारला पळताभुई थोडी करणारे भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांनी सत्ताधा-यांच्या विरोधी राज्यात काहूर उठविले होते सभागृहात मुंडे साहेबांसमोर बोलतांना मंत्र्यांची बोबडी वळत होती.
१९९४ ला शिवनेरी ते शिवतीर्थ २००३ ला अक्कलकोट ते कल्याण संघर्ष यात्रा काढून राज्यातील गावनागाव ढवळून काढले आणि आपल्या भूमीकाची आणि स्वाभिमानी विचाराची पेरणी उभ्या महाराष्ट्रात तमाम समाजाच्या मनावर केली. त्याचा परिणाम राज्यात एकाधिकारी सत्ता चालविणा-या शरद पवारांची सत्ता घालविण्यात झाले.१९९५ ला झालेल्या विधानसभा निवडूकीत सेना-भाजपा युती सत्तेत आली आणि भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
१९७७ ते १९९५ हा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा काळ म्हणजे संघर्ष चळवळी आणि परिवर्तनाचा काळ होता. संघर्ष, चळवळ आणि परिवर्तन तसेच वकृत्व, नेतृत्व आणि कतृत्व यांचा सुरेख संगम मुंडे साहेबांच्या व्यक्तीमत्वात घडून आला होता. १९९२ च्या काळात विरोधीपक्ष नेता असतांना एन्रॉन प्रकल्प आरबी समुद्रात बुडविणार, दाऊदला बेड्या ठोकणार, आजचे राज्यकर्ते म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर, या मुंडेसाहेबांच्या वक्तव्यास संपूर्ण राज्यात उदंड प्रतिसाद मिळाला होता. प्रसार माध्यमांमध्ये मुंडे साहेब लाडके नेते झाले होते. एकदिवस एकही वृत्तपत्र मुंडे साहेबांच्या बातमीशिवाय मुद्रित होत नव्हते त्यामुळै मुंडे साहेबांच्या भूमिकाची विचाराची आणि स्वाभिमानाची पेरणी महाराष्ट्राच्या मनामनावर झाली. मुंडे साहेबांच्या दमदार विचारांची व सडेतोड भ्ूमीकाच्या पेरणीची उगवन संपूर्ण राज्यात झाली त्यांच्या विचाराचे भूमीकांचे उदंड पीक संपूर्ण राज्यात आल्याने मुंडे साहेबांच्या पाश्चात ही सत्ताध-यांना त्यांच्या विचाराचा सामना करता करता नाकात दम आला आहे.
एवढेच नव्हे तर मुंडे साहेबांच्या जादुई दिलदार, दिलखुलास नेतृत्वामुळे आज ही सत्ताध-यांना भिती वाटत आहे ती मुंडे साहेबांच्या समर्थकांच्या राजकीय संयमाची मुंडे साहेब काळ, वेळ आणि संधी साध्ुन राजकीय शिकार करण्यात माहिर होते. त्यांच्या पट्टीत वाढलेले लाखो समर्थक मैदानातील जंग लढण्यात पटाईत झाले आहेत त्यामुळे मुंडे साहेबांच्या राजकीय सामाजिक विचाराचा आणि भूमीकाचा सामना साहेबांच्या हयातीतच राजकीय विरोधकांना करावा लागला नाही तर त्यांच्या पाश्चातही काल आज आणि उद्या ही मुंडे साहेबांच्या विचाराने आणि नेतृत्वाने भारावून गेलेल्या निधड्या छातीच्या समर्थकांशी करावा लागणारा आहे. म्हण्ूनच म्हणावे लागते गोपीनाथराव मुंडे काल आज आणि उद्या ही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपला करिश्मा टिकवून ठेवणार आहेत. कारण आपल्या लाडक्या नेत्याचे अकाली निघन झालं यावर आजही कोणाचाही विश्वास बसत नाही परंतु शरीर सोडून गेलेला आत्मा आणि पंचत्वात विलीन झालेला देह परत आणता येत नाही हे वास्तव असलं तरी डोळे भरून पाहिलं की आनंदाने भरून येणार मन मात्र आजही साहेबांच्या शोधात भटकत आहे. दु:खाने डोळ्यातील पाणी संपले असले तरी मनातील दु:ख आजही कायम आहे. लाखोंचा पोशिंदा ठरलेल्या मुंडे साहेबांच्या जिवनाचा प्रवास अध्र्यावरती नियतीने का थांबविला ? मोडला याचं उत्तर भ्ूतकाळाने दिले नसले, वर्तमान काळ देत नसला तरी भविष्यकाळाला द्यावा लागणार आहे कारण भाजपा नेते केंद्रीय मंत्री स्व.ना.गोपीनाथराव मुंडे यांचा करिश्मा काल आज आणि उद्या राहणार आहे.
आ.पंकजाताई मुंडे - आज, उद्या आणि परवा.
सुरवातीला दुस-या नावाच्या आणि व्यक्तीचा जो उल्लेख केला आहे ती. व्यक्ती अन्य कोणी नसून महारष्ट्राच्या राजकीय कुरूक्षेत्राचे महानायक स्व.ना.गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय सामाजिक आणि कौटूंबीक वारसदार भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ.पंकजाताई मुंडे आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत पाच वर्षापूर्वी पंकजातार्इंनी महाराष्ट्राच्या समाजकाणात आणि राजकारणात उडी घेतली. अत्य अल्प काळात केवळ बीड जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-या पर्यंत पोव्हचण्याचा प्रयत्न करणा-या पंकजाताई या एकमेव महिला युवा नेत्या ठरल्या आहेत. पंकजाताई महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात स्थिरावतात ना स्थिरावतात तोच आपल्या महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात लाखोंचे आधरवड ठरलेल्या वडीलांचे कृपाछत्र काळाने हिरावून घेतल्याने पंकजाताई एकाकी झाल्या असल्या तरी कौटूंबीक संकटातून सावरून मुंडे नावाला सार्थ अभिमान वाटावा अशा ताकतीने पंकजाताई पुन्हा खंबीरपणे उभा राहिल्याने महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांच्या आशा आकांशा पल्लवीत झाल्या आहेत. पंकजाताई यांनी आपली मुंडे साहेबांच्या पाश्चात सुरू केलेली वाटचाल जाहिर करून मुंडे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं जे स्वप्न पूर्नत्वास नेहण्यासाठी जर, तर वर विश्वास न ठेवता वास्तवाला स्विकारून महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी संघर्षात उतण्याची खुनगाठ मनाशी बाळगून पंकजाताई येत्या २७ ऑगस्ट पासून राजमाता जिजाऊंच्या घ्सिंदखेड राजा पासून आहिल्यादेवी होळकरङ यांच्या चौंडी पर्यंत संघर्ष यात्रा सुरू करित आहेत.
भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांनी १९९५ ला शिवनेरी ते शिवतीर्थ ही ऐतीहासीक संघर्ष यात्रा काढून सत्ताध-यांच्या सत्तेला राजकीय सूरूग लावला होता. राज्यातील ज्वलंत प्रश्नांना हात घालून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला होता. सत्ताध-यांनी मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा एवढा धसका घेतला होता की सत्ताधा-यांना पळताभुई थोडी झाली होती. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा परिणाम पुढे राज्यात सत्ता परिवर्तनात झाले होते. हा इतिहास केवळ १९ वर्षाचा आहे. मुंडे साहेबांच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या संघर्ष यात्रेचे आजही महाराष्ट्र राज्यात लाखो लोक साक्षिदार आहेत. तेच साक्षिदार आता ताईसाठी मावळे म्हणून ताईच्या संघर्षाची धुरा सांभाळून मुंडे नावाच्या दुस-या पर्वाचा इतिहास घडवायचा विडा उचलत आहेत म्हणूनच गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व त्यांच्या जादुई व्यक्तीमत्वामुळे त्यांच्या पाश्चात ही काल आज आणि उद्याही करिश्मा दाखविणरं ठरणार आहे त्या बरोबरच मुंडे साहेबांची वारसदार म्हणून ज्या ध्येयाने ज्या भूमीकेने पंकजाताईनी आपली वाटचाल सुरू केली आहेती आज उद्या आणि परवा महाराष्ट्र राज्यात नवा इतिहास घडवणार आहे. म्हणूनच या लेखाचे दुसरं शिर्षक आहे ते पंकजाताई मुंडे आज उद्या आणि परवा !
भाजपा जेष्ठ नेते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते म्हणून १९९५ ला शिवनेरी ते शिवतीर्थ ही ऐतीहासीक संघर्ष यात्रा काढून संपूर्ण राज्यात सत्ताधा-यांविरूद्ध वादळ उठविले होते. सत्ताधा-यांना विविध विषयावर राजकीय खिंडीत पकडून मुंडे साहेबांनी सत्तेची मस्ती आणि नशा सत्ताधा-यांची उतरविली होती. मुंबईतील गुन्हेगारी, राज्यकत्र्यांचे गुन्हेगारी जगताशी असणारे संबंयध, जे जे हत्याकांड, कामगार नेत्यांच्या हत्या, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, मुंबई दंगल, आदिवाशींचे प्रश्न, कुपोशीतांचे बळी भ्रष्टाचार, दाभोळ वित्त प्रकल्प, सत्ताधा-यांच्या सुत्रांचे सेक्स स्कॅडल, तेलगी मुंद्रांक घोटाळा, शेतक-यांच्या आत्महत्या, खुन दरोडे, महिलांवरील बलात्कार, विज टंचाई, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, अतिवृष्टी, दुस्काळी आदी प्रश्नांवर आवाज उठवून सत्ताधा-यांना पळताभूई थोडी केली होती.
आज काळ बदलला राज्यकत्र्यांचे चेहरे बदलले असले तरी आजही राज्यात आदर्श घोटाळा शेतक-यांच्या आत्महत्या, अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे डॉ.दाभोळकरांची हत्या, खून, दरोडे, महिलांवर होत असलेले दिवसाढवळ्या बलात्कार, विज टंचाई, सिंचन घोटाला, दुष्काळ, आदि प्रश्न ज्वलंत आहेत या प्रश्नांवर बोट ठेवून सत्ताधा-यांविरूद्ध नव्या दमानं नव्या ध्येयाने पंकजाताई मुंडे या सिंदखेड ते चौंडी या संघर्ष यात्रेत सत्ताधा-यां विरूद्ध रान उठवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांना आधार देण्यासाठी, आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबीयांना धिर देण्यासाठी आणि राज्यकत्र्यांच्या गेल्या १५ वर्षातील कर्तृत्वाचा पर्दापाश करण्यासाठी पोलखोल करण्यासाठी पंकजाताई मुंडे संघर्ष यात्रेच्या माध्यमापासून राज्यात परिवर्तनाच्या मोहिमेवर निघल्या आहेत. आपल्या संघर्ष यात्रेत लाखो जनतेशी त्या मुंडे पॅटर्न मध्ये संवाद साधणार आहेत. मुंडे साहेबांनी पाहिलेले सत्ता परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे एवढेच !
संघर्षाचा पहिला टप्पा
आ.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघणारी पुन्हा संघर्ष यात्रा २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर आणि ११ ते १८ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात काढण्यात येणार असुन राज्यातील ७९ विधानसभा मतदारसंघातून जवळपास तीन हजार किमीचा प्रवास यात्रेदरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील यात्रेचा दौरा पुढील प्रमाणे - दि.२८ ऑगस्ट सकाळी ११ वा. सिंदखेडराजा, २.३० वा. बीबी, ३.३० वा. सुलतानपुर, ४ वा. लोणार,५ वा. तळणी,५.४५वा, मंठा(सभा), रात्रौ८वा. जिंतून (सभा), मुक्काम-परभणी(पत्रकार परिषद), सकाळ ११ वा. गंगाखेड (सभा), दुपारी १२.३० वा.पालम, १.३० वा. लोहा, २ वा. केंधार (सभा), ३.४५ वा.मुखेड, १.१५ वा. रातोळी, ५ वा. नरसी नायगांव (सभा), मुक्काम -नांदेड. दि.३० ऑगस्ट सकाळी ९.३० वा.नांदेड (पत्रकार परिषद), १०.३० वा. अर्धापुर, ११.१५ वारंगाफाटा, दुपारी १२ वा. कळमनुरी (सभा), १ वा. हिंगोली (सभा), ४.३० वा.वशिम (रॅली), ५ वा.मालेगांव (सभा), मुक्काम-शेगांव, दि.१ सप्टेंबर-सकाळी ९ वा. संत गजानन महाराजांचे दर्शन -स्वागत, ११ वा.खामगांव (सभा), दुपारी १ वा. नांदुरा, १.३० वा. मलकापूर (सभा), ४.३० वा. बोधवड (सभा), संध्याकाळी ७ वा. जामनेर (सभा), रात्रौ १० वा.पहुर, मुक्काम फर्दापूर. दि.२ सप्टेंबर-सकाळी १० वा. अजिंठा, ११वा.सिल्लोड (सभा),दुपारी १.३० वा.फुलंब्री (सभा), ४ वा.पिशोर, ४.३० वा.मेहगांव (सभा), संध्याकाळी ७ वा. कन्नड, मुक्काम-औरंगाबाद.दि.२ सप्टेंबर-सकाळी औरंगाबाद शहरातून रॅली व दुपारी १२.३० वा. जाहिर सभा होणार आहे.

लेखक
प्रा.डॉ.नामदेव सानप
मो.९४२१५७३९३३
comments