आ.पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या संकल्पनेतुन साकारला जलसंधारणाचा वैद्यनाथ पॅटर्न

26/07/2013 20 : 46
     483 Views

परळी व अंबाजोगाई तालुक्यात अवघ्या दोन महिन्यात
उभारले २२ बंधारे, तुडूंब भरून पाणी वाहू लागले
ताब्यात सर्व यंत्रणा असली आणि तिचा योग्य वापर करण्याची क्षमता नसली तर काहीच उपयुक्त योजना राबवल्या जात नाहीत. याउलट हाती असलेल्या यंत्रणेचा कल्पकतेने, दूरदृष्टीने वापर केला तर काय कायापालट होवू शकतो हे परळीच्या लोकप्रिय आ.सौ.पंकजाताई पालवे-मुंडे यांनी दाखवुन दिले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्था आणि खा.गोपीनाथराव मुंडे यांचा खासदार फंड यांचा एकत्रित वापर करून त्यांना मतदारसंघात आधुनिक जलक्रांती घडवून आणली आहे. अवघ्या दोन महिन्यात शिरपूरच्या धर्तीवर वैद्यनाथ पॅटर्न निर्माण करून जलसंधारणाची आदर्श कामे उभी केली आहेत. दहा गावांमध्ये बावीस जलसंधारणाची कामे उभे करून ३०० कोटी लिटर पाणी साठवण व मुरण्याची सोय केले आहे. या कामांमुळे संभाव्य पाणीटंचाईच्या प्रश्नांवर कायमचा तोडगा निघाला असून आ.पंकजातार्इंच्या कामाचा आदर्श आदर्श इतर लोकप्रतिनिधींनी घेतला तर भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
यावर्षी बअीड जिल्हा दुष्काळात होरपळून निघाला. यामुळे हळव्या मनाचे खा.गोपीनाथराव मुंडे व आ.सौ.पंकजाताई पालवे यांना फार त्रास झाला. अशी वेळ भविष्यात निर्माझ होवू नये,पाण्यासाठी आपणच कायमची उपाय योजना करावी अशी भूमिका जिल्ह्याचे खासदार गोपीनाथराव मुंडे यांनी घेतली. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर उभे करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर परळी तालुक्यात शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधारे बांधण्याचे कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी पुढाकार घेतला तो या भागाच्या लोकप्रिय आमदार लोकप्रतिनिधी आ.पंकजाताई पालवे यांनी खा.गोपीनाथराव मुंडे यांनी कुठे कसा बंधारा बांधून पावसाचे पाणी अडविता येईल? हे पाहण्याची आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी आ. पंकजातार्इंवर सोपविली. त्यांनी ही जबाबदारी आव्हान म्हणुन स्विकारली आणि तालुक्याचा भौगौलिक अभ्यास केला. शिरपूर पॅटर्नचे जनक आणि प्रसिध्द भूजलतज्ञ सुरेश खानापूरकर यांची भेट घेवून या पॅटर्नची संकल्पना समाजावून घेतली. त्यानंतर आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकांना हा पॅटर्न समजावा आणि लोकसहभाग वाढावा यासाठी आ.पंकजाताई मुंडे-पालवे यांनी पुढाकार घेवून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी जिल्हा पातळीवर जलसंकल्प परिषदेच्या रुपाने कार्यशाळा घेतली. यात सुरेश खानापुरकर यांच्यासह इतरही तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याचा फायदा असा झाला की, जलसिंचनाच्या विषयाने वातावरण ढवळून निघाले आणि ब-याच लोकप्रतिनिधींनी असे बंधारे उभारण्याचा संकल्पही केला
प्रत्यक्ष बंधारा उभारणी -
आ.पंकजाताई पालवे यांनी प्रथम स्वतः बंधारा बांधण्याचा निर्णय घेवून जागा शोधण्यास सुरूवात केली. परळी तालुक्याचा भौगौलिक अभ्यास करून आपण एखादी योजना राबविली तर तिचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा हा जाणत्या लोकप्रतिनिधींचा दृष्टीकोण असतो तसा त्यांनी ठेवला. कुठे बंधारा बांधून पाणी जमिनीत मुरवले म्हणजे पाणी पातळीत जास्तीत जास्त वाढ होईल. या दृष्टीने विचार केला. कामाचे स्वरूप मोठे असल्याने त्याची झळ सामान्य शेतक-यांना बसणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. ती त्यांनी बंधा-यसााठी जागा निवडताना घेतली. यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. संबंधित विभागाचे इंजिनिअर, प्रत्यक्ष काम केलेले कार्यकर्ते आणि जाणकार यांच्या साक्षीने बंधा-यासाठी जागा निवडण्यात आली.
पहिला बंधारा अर्थात पायल प्रोजेक्ट वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्याचा निर्णय घेवून तशी अंमलबजावणी करण्याचे ठरवले. कारखान्याच्या पुर्व बाजुला लोणगडी नावाच्या लहानशा नदीचे पात्र आहे. प्रथम या पात्रातच बंधारा बांधण्याचे ठरवले. रामनवमीचा मुहूर्त साधून बंधा-याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श राज्य कसे करावे ? याचा प्रत्यय जगाला घालुन देणा-या रामाच्या जयंतीला सुरू झालेल्या या बंधा-याचे काम अतिशय युध्द पातळीवर सुरू करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत यावर्षीच्या पावसाळ्यात पाणी धरणात साठवायचे या उद्देशाने कामाला सुरूवात करण्यात आली. खा.गोपीनाथराव मुंडे यांचेही या कामावर अतिशय बारकाईने लक्ष होते. बंधा-याचे काम योग्य पध्दतीने आणि गतीने होते की नाही हे पाहण्यासाठी खुद्द गोपीनाथराव मुंडे व आ.पंकजाताई पालवे यांचे बंधा-याच्या कामाकडे लक्ष होते. आमदार पंकजातार्इंचे तर त्यावर अतिशय बारकाईने लक्ष होते. या भागात आल्या की बंधा-याच्या कामाची पाहणी करत असत. परिणामी या बंधा-याच्या कामात खंडही पडला नाही आणि बंधा-याबद्दल लोकांमध्ये आकर्षणही वाढले. त्यामुळे अनेकजण बंधारा पाहण्यासाठी येवून आमच्याकडेही असाच बंधारा करा असा आग्रह नागरिक धरु लागले.
जिद्द आणि चिकाटीच्या ताकदीवर बंधा-याचे काम अतिशय कमी वेळेत पुर्ण झाले. लोणगडी नदीवरील हा तयार झालेला बंधारा १८ फुट काळ्या मातीत खोदलेला असून पाणी झिरपण्यासाठी ३ ते ५ फुट मुरूम आणि कठीण खडक त्यात फोडण्यात येवून पाणी झिरपण्यासाठी परक्युलेशन स्टाटापर्यंत खोली करण्यात आली आहे. तो नाला १२०० मिटर लांब व ७५ फुट रुंद करण्यात आला असून यात १०० कोटी लिटर पाणीसाठा व झिरपण होईल असा अंदाज आहे. या ठिकाणी सिमेंट बंधारा ८ मिटर खोलीला लावून बांधण्यात आला आहे.
या बंधा-याचे काम सुरू असताना आ.पालवे यांनी या प्रकल्पाची तांत्रिक बाजु सांभाळणारे अभियंते कार्यकत्र्यांबरोबर बैठक घेवून परळी व अंबाजोगाई तालुक्यातील पुर्ण नाल्याची माहिती घेतली. या बरोबरच नाल्यावर शासनाने बांधलेल्या सिमेंट बंधा-याची माहिती तालुका कृषी अधिका-यांकडून घेतली. त्या सर्व बंधा-योचे पुर्ण सव्र्हेक्षण करून त्या बंधा-यातून होणारे पाण्याचे लिकेज काढण्याकरीता बंधा-याची दुरूस्ती कशी करता येईल, त्यातुन लिकेज कसे थांबवता येईल व बंधा-याच्या पाठीमागे खोलीकरण व रुंदीकरण कसे करता येईल याचा अभ्यास तज्ञांशी सल्ला मसलत करून घेतला.
दौनापूर - यानंतर लगेच दौनापूर येथील सिमेंट बंधा-याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. यात स्थानिक शेतक-यांना बरोबर घेवुन बंधा-याच्या समोरिल बाजुस शेतक-यांच्या मतदीने चार-पाच फुट खोली करून त्याठिकाणी नागापूर तलावातील गाळ आणुन पुर्ण नादूरूस्त सिमेंट बंधा-याच्या वरच्या टोकापर्यंत काळ्या मातीची पॉझिटीव्हफसिओटी करून काळी माती वाहुन जावू नये म्हणुन त्यावर मुरूम व दगडगोट्याचा थर देवून बंधा-याचे पुर्ण लिकेज थांबवले. त्याच्या पाठीमागे पाणी साठवणीसाठी १८० मिअर लांब एक ते दोन खोली करून सदरील बंधा-याची पाणी साठवण व झिरपण क्षमता वाढविली. तो बंधारा आज पाण्याने पुर्ण भरला असून पाण्याची थोडीही गळती होत नाही.
घाटनांदूर -
असाच प्रयोग घाटनांदूर येथील दोन सिमेंट बंधा-याच्या पाठीमागे करण्यात आला. त्या ठिकाणी खुप कठीण खडक होता. तो फोडून पाणी जास्तीत जास्त जमिनीत कसे साठेल व जमिनीवर पाण्याचा साठवा होईल हा प्रयत्न केला. असाच प्रयोग पट्टीवडगांव येथे करण्याचे ठरवले. गावाच्या पुर्व बाजुस एक सिमेंट बंधारा होता तो बंधारा काळ्या मातीचा पॉझिटीव्हफसिओटी करून दुरूस्त केला. तो नाला एक किलो मिटर खोली व रुंदीकरणाचे काम करण्याचे ठरवले. या बंधा-याच्या पाठीमागे १८० मिटर लांबीकरण करण्यात आले. याचबरोबर गावच्या पश्चिम दिशेला एक नाला असुन त्यावरही खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्या नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्याचा माणस आहे. याचप्रमाणे धर्मापुरी येथे गावाच्या उत्तरेला दोन बंधा-याच्या पाठीमागे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करून त्याठिकाणीही भरपूर पाणीक्षमता वाढविण्यात आली आहे. हे काम सुरू असतानाच वैद्यनाथ पॅटर्नची व्याप्ती बाळशाकडून प्रोढत्वाकडे जावू लागली. याचाच प्रत्यय म्हणजे मौजे उजनी येथील ग्रामस्थांनी खा.गोपीनाथराव मुंडे साहेब व आ.पंकजातार्इंची भेट घेवून अशी कामे आमच्याही गावात व्हावीत अशी मागणी केली. पंकजातार्इंनी या मागणीला साद घालत पावसाळा तोंडावर आला असतानाही दोन टु-टेन पोकलेन व तीन-चार टिप्पर त्याठिकाणी पाठवून पावसाळ्यापुर्वी स्वतः जातीने लक्ष घालुन एका नालीवर दोन बंधा-याच्या प्रस्तावित साईड सोडून अर्धा किलो मिटर खोलीकरण व रुंदीकरण केले. त्याठिकाणची गावाची पाण्याची समस्या कायमची सुटेलच परंतु शेतक-यांना शेतीसाठीही ब-याच प्रमाणात मदत होईल अशी व्यवस्था केली.
याच काळात वैद्यनाथ पॅटर्नची चळवळ पुर्ण अंबाजोगाई व परळी तालुक्यात सुरू झाली होती. बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणाहून बरेच अधिकारी व नागरिक या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येत होते. लोकांची हळुहळू पाणी आडवणे व जिरवण्याची मानसिकता वाढत होती. त्यातुनच पुढ रेवली (ता.परळी) येथील नागरिकांनी जलसंधारणाचे खोलीकरण, रुंदीकरण व जुन्या बंधा-याची दुुरूस्ती करण्याची मागणी पंकजातार्इंकडे केली. त्या ठिकाणीही जुन्या बंधा-याची दुरूस्ती करून तीन बंधा-याचे खोलीकरण व दुरूस्तीकरण करून दिले. त्याचबरोबर सिरसाळा-परळी रोडवर रेवलीच्या उत्तरेला दोन्ही शिवारातील जुन्या सिमेंट बंधा-याचे पाठीमागे व रस्त्यावरील पुलाच्या खाली चारशे मिटर लांबीकरण, चोवीस ते अठ्ठावीस मिटर रुंदीकरण व एक ते दोन मिटर खोलीकरण केले. त्याठिकाणी २५ मेला झालेल्या अवकाळी पावसाने तो बंधारा पुर्ण पाण्याने भरला. त्यावर शेजारील शेतक-यांनी कापूस लागवड केली आणि ऊसालाही पाणी देता आले. त्याच काळात शेजारील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढली. त्याठिकाणी भविष्यात विहीर व बोअरला पाणी कमी पडणा नाही, रेवलीच्या दक्षिणेला वाका हे गाव आहे.वाका या गावातही पंकजातार्इंनी एका नाल्यावर जवळ जवळ प्रस्तावीत दोन बंधा-याच्या साईड केल्या असुन गावच्या पुर्वेला १८० मिटर खोलीकरण, रुंदीकरण व लांबीकरण करण्यात आले तर गावच्या पश्चिमेला पाझर तलावापासून गावच्या शेजारील सार्वजनिक विहीरीपर्यंत नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व लांबीकरण करून त्याठिकाणी नाल्याच्या बाजुने वस्तीवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ताही करून दिला. त्याचबरोबर गावच्या पश्चिमेला वस्तीवर आणखी एक सिमेंट बंधारा होता तिथेही कामाची सुरूवात केली. यामुळे वाक्यात भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही आणि विहीर व बोअरच्या पाणीपातळीतही वाढ होईल यात कांहीच शंका नाही.
नाथ्रा येथे आगळा-वेगळा प्रयोग-वरीलप्रमाणेच नाथ्रा या गावी जलसंधारणाचाच पण थोडा वेगळा प्रयोग करण्यात आला. या गावचा जिओलॉजिकल स्टाटा इतर साईटच्या तुलनेत खूप वेगळा होता. याठिकाणी २०-२२ फुट काळीमाती व चुनखड त्या खाली तीन-चार फुट दगडमोटे व कडकीचा थर होता. त्याठिकाणी २५-२६ फुट खोलीचे साधारणतः १००-१५० मिटर लांबीचे चार डोह करण्यात आले. त्यामुळे पुर्णकाळात त्याठिकाणी ८०० मि.मि. पाऊस पडला तरी पाणी जमिनीच्यावर साठणार नाही. या नाल्यात आलेले पुर्णझपाणी शिवारात चोहीकडे पसरले आणि गावातील पाणीसाठ्याच्या पातळीत वाढ होईल. हा प्रयोग इतरांना मार्गदर्शक व आदर्श घेण्यासारखा आहे. मागील दोन महिन्याच्या काळात कौठळी/तळेगांव, दौनापूर, घाटनांदूर, धर्मापूरी, पट्टीवडगांव, उजनी, रेवली, वाका, सिरसाळा, नाथ्रा या गावांच्या शिवारांमध्ये एकुण २२ जलसंधारणाचे प्रकल्प उभारण्यात आले आहे. आ.पंकजाताई पालवे-मुंडे यांनी अल्प काळात उभे केलेले जलसंधारणाचे काम हे इतर लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावे असेच आहे.


ज्ञानोबा सुरवसे
परळी वैजनाथ
comments