शिक्षणाविषयी डॉ.काकोडकर

18/04/2013 20 : 30
     693 Views

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. ब्रिटीशांमुळे मातृभाषा ही ज्ञानभाषा यापासून आपण मागे पडलो, भरकटलो. त्यामुळे आता मराठी ज्ञानभाषा होईल असे मला वाटत नाही. असे असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. कारण मातृभाषा हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. संकल्पना घट्टा व्हायला त्याची गरज आहे. पहिलीपासून इंग्रजीची सक्ती असू नये. नंतरच्या टप्प्यात अन्य भाषा आणि उच्च शिक्षणाकडे जाताना विद्याथ्र्यांना इंग्रजी अवगत झाली पाहिजे.
इंग्रजी ज्ञानभाषा झाल्यामुळे आपल्याकडे होणा-या संशोधनाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या जनसमुदायापुडे होते हा फायदाही लक्षात घ्यायला हवा. ज्ञाननिर्मितीसाठी इंग्रजी भाषेचा वापर होत असला तरी सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान लाकभाषेतूनच प्रभावीपणे पोहोचविता येईल. असे केल्याने वैज्ञानिक आणि समाजामधील संवाद वाढेल आणि त्यामुळे विज्ञानाला चालना मिळायला मदत होईल.
सध्याचे युग ज्ञानावर आधारित अर्थकारणाचे आहे. आजचा जमाना हा अ३ चा आहे. अपूुहशीश,अपूेपश,अपूींळाश कनेक्टेड सोसायटी हा नव्या जगाचा नियम आहे. तो आपण आत्मसात करून आपले क्षितिज रूंदावायला हवे. समाजाने तो लवकरात लवकर आत्मसात करावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत.
देशाच्या सामाजिक व आर्थिक बांधणीमध्ये शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असते. शिक्षणाचे योग्य पद्धतीने विकास केल्यास त्यातून एक सक्षम देश धडविता येऊ शकतो. विद्यापीठीय शिक्षणातून नसतेच विद्यार्थी न घडविता त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन चांगले तज्ज्ञ घडवणे आवश्यक आहे. सामाजिक तसेच आर्थिक विकासासाधइी शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा व्हायला हव्यात. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठीय शिक्षणामध्ये गुणवत्ता आणली पाहिजे. हा आग्रह धरला तर विद्यापीठांमधील संशोधनाला गती मिळेल. विद्यापीठानी उद्योगांशी समन्वय साधताना समाजाशी असलेले ऋुणानुबंध तुटणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
अफाट लोकसंख्या असलेल्या भारताची ओळख विकसित देशांची हक्काची बाजारपेठ, इथवर सीमित राहता नये तर बुद्धिमान मनुष्यबळाच्या जोरावर नवनिर्मितीची ताकद असलेला देश म्हणून सा-यांनी त्याच्याकडे पाहायला हवे. पण त्यासाठी संधींपासून वंचित राहिलेल्या या देशातील उपजत उुद्धिमत्ता असणा-यांचा शोध घेऊन त्यांना पोषक संधींची कवाडे खुली करणे, हे महासत्तेच्या टप्यावर असलेल्या भारतापुढचे खरे आव्हान आहे. वंचितांच्या आर्थिक विवंचना दूर करण्याबरोबरच त्यांच्या कुशाग्र बुद्धीची मशागत करणारे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि वातावरण ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.
शिक्षण व्यवस्था ही पीअरड्रिव्हन म्हणजेच समविचारी मानसिकतेने प्रेरित अशी हवी. शैक्षणिक निर्णयांची स्वायत्तता सर्व शिक्षण सस्थांत असायला हवी.
comments