पुस्तकांच्या सहवासातलं करिअर

2017-06-16 11:53:18
     533 Viewsपुस्तकं, वर्तमानपत्र, इंटरनेट असे काळानुसार माहितीच्या स्रोतांमध्ये बदल घडत गेले. पण आजही माहितीचा सर्वात मोठा स्रेत म्हणून पुस्तकांकडेच पाहिलं जातं. कारण इतिहासातील संदर्भासाठी इंटरनेटपेक्षा पुस्तकंच अधिक उपयुक्त ठरतात. आपल्याला एका वेळी अनेक पुस्तकं आणि संदर्भ हवे असतील तर ग्रंथालयाची वाट धरण्याशिवाय गत्यंतर नसतं. पण या ग्रंथालयात जाऊन वाचनानंद मिळवता येतो, तसाच ग्रंथपाल बनूनही ग्रंथाच्या सहवासात राहता येतं. पुस्तकवेड़या व्यक्तींनी लायब्ररी सायन्स या क्षेत्रात करिअर केलं तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचणं, आपल्या माहितीत ज्ञानात भर घालणं, स्वत:ला अडलेल्या प्रश्नांचं उत्तर एखाद्या पुस्तकातून अगदी सविस्तर रूपात मिळणं हा नेहमीच एक सुखद अनुभव असतो. वाचनालयात लेखकांच्या नावानुसार, प्रत्येक विषयाप्रमाणे किंवा पुस्तकांच्या आद्याक्षराप्रमाणे पुस्तकांची मांडणी केलेली असते. तिथे एकाच वेळी लाखो पुस्तकं असतात. तिथल्या पुस्तकांमधून आपल्याला हवं असलेलं पुस्तक नक्की कसं बरं शोधायचं? तसं तिथे असणा-या ग्रंथपालाला आपल्याला हव्या पुस्तकाचं नाव किंवा लेखकाचं नाव सांगितल तरी तो लगेच आपल्याला ते पुस्तक काढून देतो. इथे ग्रंथालयशास्त्राची कमाल दिसून येते. ग्रंथालयातील काम म्हटल्यावर केवळ पुस्तकांची मांडणी करणं इतकंच नसतं, त्यामुळे ग्रंथालयात नोकरी करायची तर ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास असणं गरजेच असतं. ग्रंथालयशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केल्यास त्यामध्ये करिअर करणं सोपं होतं. ग्रंथालयशास्त्र (लायब्ररी सायन्स) आणि माहितीशास्त्र या विषयाचा प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासक्रम १२वीनंतर सर्टिफिकेट कोर्सद्वारा करता येतो. त्यानंतरचा टप्पा म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम. भारतातील जवळपास ७० विद्यापीठांमध्ये लायब्ररी सायन्सचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसंच कामगार कल्याण मंडळातर्फेही तो शिकवला जातो. या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे काम करता करता तुम्ही शिक्षण घेऊ शकता. विशेष म्हणजे, एकेक टप्प्यावरील परीक्षा देत यात कारकिर्दीची पायरी हळूहळू चढता येते. महाविद्यालय, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासारखी पद उपलब्ध असतात. विद्यापीठातील ग्रंथालयात वरिष्ठ ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल, अशी पदांची चढती श्रेणी असते. त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालये, वस्तुसंग्रहालयं या ठिकाणीदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.


बारावीनंतर कोणत्याही शाखेतून पदवी घेऊन बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स (बी. लिब.) हा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो. त्यानंतर मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (एम.लिब.) हा अभ्यासक्रम आहे.

यापुढे जर एखादा विषय घेऊन त्यात प्रावीण्य मिळवायचं असेल तर एम.फिल. आणि पीएच.डी. करता येतं. तसेच पदवी आणि मास्टर्स पदवीला ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून, ग्रंथालय शास्त्रातून सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ग्रंथालयशास्त्राचा प्राध्यापक होण्याची संधी मिळते.

नोकरीच्या संधी
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक किंवा सरकारी ग्रंथालय, शाळा- महाविद्यालयं, विद्यापीठ, बँका, सार्वजनिक संस्था, कायदेसंस्था, वृत्तपत्र प्रकाशन संस्था, खासगी संस्था, म्युझियम्स, फॉरेन एम्बसी, फोटो किंवा फिल्म ग्रंथालय, माहिती केंद्र आणि मोठ़या कंपन्या इत्यादी क्षेत्रांमध्ये वाव मिळतो.

वेतनश्रेणी

वेतनश्रेणी ही प्रत्येकाच्या शिक्षणावर आणि अनुभवावर अवलंबून असते. असिस्टंट लायब्ररियन, डेप्युटी लायब्ररियन आणि लायब्ररियन यांची पदे अनुक्रमे लेक्चर्स, रीडर्स आणि प्रोफेसर यांच्याइतकीच महत्त्वाची असतात. त्यांचं वार्षिक वेतन साधारणत: १,००,००० ते ३,००,००० रुपये इतकं असतं.
ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ३ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे.
ज्या विद्याथ्र्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्याथ्र्यांनी संभाजीराजे ग्रंथालय आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय माने कॉम्पलेक्स बीड येथे तात्काळ संपर्क साधावा. ६९६५०६५०३४ ९५२७८१५१५१ ९५५२५५६३९७ ७४२०९०४०५५

प्राचार्य गणेश पोकळे
comments