प्रसारभारतीतील करिअरची संधी

10-06-2016 : 11:08:27
     488 Views

प्रसारभारतीतील करिअरची संधी
गेल्या वर्षी प्रसारभारतीने वेगवेगळ्या पदातील भरतीसाठी मोठी जाहिरात काढली होती. त्यातल्या कार्यक्रमाशी संबंधित करिअरच्या संधींवर आपण प्रकाश टाकूया.
झीरीरी इहरीींळभारतातील प्रसारण क्षेत्रातील महामंडळ म्हणजेच प्रसारभारती. याची प्रसारभारती कायदा १९९० अन्वये स्थापना झाली. भारतातील प्रसारण सेवेतील मोठ़या अग्रेसर अशा वेगवेगळ्या प्रसारण सेवेत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचा सामावेश होतो. प्रसारभारती महामंडळाअंतर्गत त्यांचं कार्य सुरूझालं. मुळात प्रसारभारती महामंडळाअंतर्गत याची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आधी सुरू असलेलं कार्य आणि त्यामध्ये महामंडळामुळे झालेले बदल असा काहीच बदल दिसून येत नव्हता. याला कारण होतं ते सरकार दरबारी असणारी दिरंगाई. गेल्या वर्षी म्हणजे २३ मार्च २०१३ रोजी प्रसारभारतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील भरतीसाठी मोठी जाहिरात काढली होती. त्यातल्या कार्यक्रमाशी संबंधित करिअरच्या संधींवरती आपण प्रकाश टाकूयात.
मुळात दोन प्रकारची विभागणी यामध्ये करता येते. त्यात प्रोग्राम म्हणजे कार्यक्रमांशी संबंधित आणि प्रसारणाशी संबंधित असे दोन विभाग थेट पडतात. त्यामध्ये पुन्हा प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह आणि प्रोडक्शन असिस्टंट असे भाग पडतात. यात पुन्हा जी वेगवेगळी विभागणी केली जाते ती पुढील प्रकारे असते.
ट्रान्स्मिशन एक्झिक्युटिव्ह यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्षेत्राप्रमाणे जी विभागणी करता येते त्यात जनरल एक्झिक्युटिव्ह, प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, फॅमिली वेल्फेअर एक्झिक्युटिव्ह, फार्म रेडिओ एक्झिक्युटिव्ह, फार्म रेडिओ रिपोर्टर, स्क्रिप्ट्स एक्झिक्युटिव्ह, एज्युकेशन एक्झिक्युटिव्ह, एज्युकेशन ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह, सायन्स रिपोर्टर, फिल्ड रिपोर्टर आणि ट्रायबल रिपोर्टर अशी ती वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे विभागणी आहे. याखेरीज वेगवेगळ्या भाषांमधून काही पद ठरलेले असतात.
भाषावार कार्यक्रम निर्मात्यांची गरज
प्रसारभारतीच्या प्रसारण सेवेतील भारतातील मुख्य भाषांप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रम निर्मात्यांची आणि सहाय्यकांची गरज पडत असते. यामध्ये प्रत्येक भाषेप्रमाणे किमान ८ ते १० एवढ़या जागा असतात. या भाषांची प्रसारण सेवा गेल्या कित्येक वर्षापासून आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर सुरू आहे. यात पुन्हा बातमी सेवा आणि कार्यक्रम सेवा असे दोन भाग पडतात. त्यातील कार्यक्रमांतील करिअरच्या संधी आपण बघत आहोत. या भाषा कोणकोणत्या आहेत, तर यात हिंदी, संस्कृत, उर्दू, आसामी, उडिया, बंगाली, मणिपुरी, बोडो, तेलगु, तामिळ, मल्याळम, कानडी, मराठी, कोंकणी, गुजराती, पंजाबी, काश्मिरी, डोंगरी, मैथिली, संथाली, नेपाळी आणि सिंधी या भाषांचा प्रसारणामध्ये समावेश होतो. या प्रत्येक भाषेप्रमाणे ८ ते १० अशा कार्यक्रम निर्मात्यांची किंवा सहाय्यकांची गरज असते.
झोननुसार रचना
प्रसारणाच्या आणि कार्य करण्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून यामध्ये काही भाग केलेले आहेत. याला झोनल सिस्टम’ असेसुद्धा म्हणतात. यात नॉर्थ म्हणजेच उत्तर झोन, नॉर्थ इस्ट म्हणजे उत्तर पूर्व झोन, इस्ट म्हणजे पूर्व झोन, वेस्ट म्हणजे पश्चिम झोन आणि साउथ म्हणजे दक्षिण झोन असे मुख्यत: पाच वेगवेगळे विभाग किंवा झोन केलेले दिसतात.
पदांसाठीची पात्रता
यात ज्या पदांसाठी जी मूळ पात्रता आहे त्यामध्ये दोन वेगवेगळ्या पात्रतेच्या परीक्षा त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात एमए म्हणजे पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-यांना प्राधान्य दिले जाते. त्यातल्या त्यात ही पदव्युत्तर परीक्षा जनसंवादामधून केलेली असेल तर त्याला आणखी जास्त प्राधान्य दिलं जातं. ही पदव्युत्तर परीक्षेच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रासोबतच त्यांना आणखीन जास्त अग्रक्रम म्हणजे साहित्य, नाट़य, वक्तृत्व , स्वत:चे काही प्रकाशन या गोष्टींनुसार त्यांचा अग्रक्रम ठरवला जातो. या खेरीज ज्या भाषेमधून कार्य करायचे आहे त्या भाषेवर किती प्रभुत्व आहे यालासुद्धा महत्त्व दिले जाते. पात्रतेसाठीचा दुसरा मुद्दा आहे तो पदव्युत्तर ऐवजी पदवी परीक्षेचा. यावेळी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीबरोबरच मान्यताप्राप्त डिप्लोमा असणं आवश्यक आहे. हा कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारांतून असू शकतो तेदेखील प्रसारभारतीच्या जाहिरातींमध्ये नमूद केलेले असते. त्यात नाट़य, कल्पना, सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, साउंड रेकॉडग, साउंड डिझाइन, एडिटिंग, अ‍ॅक्टिंग, कला दिग्दर्शन, प्रॉडक्शन डिझाइन यापैकी कोणत्याही एखादा विशिष्ट डिप्लोमा ग्राह्य धरला जातो. याखेरीज ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठाला सोडून ज्यांचा समावेश केला जातो. त्यामध्ये दिल्ली राष्ट्रीय नाट़य विद्यालयआणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट़यूट इंडिया म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट आणि प्रशिक्षण संस्था, पुणे. यांचा त्यात समावेश केला जातो. याखेरीज कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगीत क्षेत्रामध्ये केलेला डिप्लोमा किंवा पत्रकारितेमध्ये केलेला पदव्युत्तर डिप्लोमा यालादेखील प्राधान्यक्रम दिला जातो.
एकूणच प्रसारभारती महामंडळाच्या खूप मोठ़या प्रमाणावर भरती झालेली आहे. ही पात्रता ओलांडल्यानंतर त्यांची एक प्रवेशपरीक्षा असते ती द्यावी लागते. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येते आणि त्यानंतर नेमणूक होते. अर्थातच सरकारी विभागातील नेमणूक आणि सहावा वेतन हा सुरुवातीपासूनच सर्व कर्माचा-यांना लागू असतो. तेव्हा खूप मोठ़या प्रमाणावर कार्यक्रम निर्माता किंवा कार्यक्रम सहाय्यकाच्या साठीच्या जागा प्रसारभारतीमध्ये असतात आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी विद्याथ्र्यांना खुणावत असते.
comments