साहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक

17-02-2016 : 07:16:01
     364 Views

महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या विकासाचा बारकाईने विचार करणारा नेताच हरपला अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. त्याच प्रमाणे बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठे खिंडार पडते की काय असे सर्वसामान्य व्यक्तीला वाटत असताना आपणही कर्तृत्ववान साहेबांची कर्तृत्ववान लेक असल्याचे आपल्या कामातुन, तरुण, उच्च विद्या विभुषीत खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आज बीडची जनता आदराने साहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक असे म्हणत आहे.
चंदनाच्या शितलतेलाही संकोच वाटावा असा शांत स्वभाव, सय्यमी व्यक्तिमत्व लाभलेल्या, बीड जिल्ह्याच्या खासदारांनी विकासाचा परिपूर्ण अभ्यास, विकासाचे प्रलंबित प्रश्न, शेतकरी-कष्टकरी-उसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाणीव लक्षात घेवून बीड जिल्ह्याचा विकास हेच धेय समोर ठेवून अभाळाऐवढे कोसळलेले दु:ख उरामध्ये दडपुण खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी कामाला सुरवात केली. पालकमंत्री पंकजाताई यांनी जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यातील अनेक गावांना लाखो रुपयांचा निधी देवून जलक्रांतीच्या माध्यमातुन कृषी क्रांतीची बीजे रोवली आहेत. त्यामध्ये खा. डॉ. प्रितमताई त्यांना समर्थ साथ देत आहेत. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे भांडवल करुन कित्तेक वर्षे राजकारण करणा-यांना धक्का देत पालकमंत्री पंकजाताई आणि खा. प्रितमताई यांनी एका वर्षात दोन हजार ८०० कोटी रुपये मंजुर करुन घेतले. त्यामुळेच आज परळी-बीड-नगर रेल्वेचे काम जलद गतीने प्रगती पथावर आहे. त्यामुळे बीड रेल्वेचे मुंडे साहेबांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या पश्चात पालकमंत्री पंकजाताई आणि खा.डॉ. प्रितमताई यांनी पुर्ण करण्याचा विडाच उचलला आहे. केंद्राचा निधी, राज्य सरकारचा जास्तीचा निधी, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असो अथवा खासदार निधी असो जास्तीत जास्त खर्च विकास कामावर करण्यात खासदार तार्इंचा आग्रह आहे. सर्वसामान्य व्यक्तीची कामे तात्काळ मार्गी लागावी यासाठी त्यांनी हॉटस अप वर पत्राचा निपटारा करण्याची पध्दत सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसामान्याचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचत आहे. खासदार ताई ज्या भागात दौरा करतात त्या ठिकाणी त्यांच्या विकास कामामुळे हजारो नागरीक त्यांना सतत आर्शीवाद देत आहेत.
खासदार प्रितमताई आणि पालकमंत्री पंकजाताई यांनी दुष्काळात बीड जिल्ह्याचे केवळ प्रसिध्दीसाठीच नव्हे तर खरे-खुरे पालकत्व स्विकारत जिल्ह्यात चारा छावण्या चालु केल्या आहेत.त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक शेतक-यांना दुष्काळात दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर विद्याथ्र्यांना मोफत शालेय पासची सुविधा उपलब्ध केली आहे.
ज्या बीड जिल्ह्यातील आठरापगड जाती-धर्माच्या नागरीकांनी आपणाला निवडून दिले आहे. त्यांना दुष्काळाच्या खाईत वा-यावर न सोडता त्यांचे पालकत्व स्विकारुन आणि दुष्काळाने त्रस्त झालेल्या बीड वाशीयांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचे लक्षात येताच दि.१७ फेब्रुवारीपासुन ३ मार्च पर्यंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात मोठ्यात मोठ्या शस्त्रक्रिया देखिल मोफत करण्यात येणार आहेत. यावरुन स्व:ता डॉक्टर असलेल्या खासदार प्रितमताईनी सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेचा वसा घेतला आहे. खासदार डॉ. प्रितमताई यांची लोकसभा सभागृहातील कामकाज आणि एकुणच विकास कार्याचा आढावा घेता गोपीनाथराव मुंडे साहेबांची लेक आणि विकास कार्यात नंबर एक हे त्रिकालाबाधीत सत्य कोणीही नाकरु शकणार नाही याची प्रचिती बीड जिल्ह्यातील जनता घेत आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचा आलेख सतत खा. डॉ. प्रितमताई उंचावत ठेवतील आणि बीड जिल्हावाशीयांची स्वप्न पुर्ण करत आहेत. खासदार तार्इंनी शेवटच्या माणसाचा विचार करुण महाआरोग्य शिबीरात सहभागी होऊन सर्वसामान्य बीडकरांची सेवा स्व:ता शिरावर घेतली. आज बीड जिल्ह्यातील शेवटचा माणुस शेवटच्या स्वासापर्यंत आपल्या लाडक्या खासदारांसोबत राहील हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती आणि डॉ. प्रितमतार्इंना वाढदिवसच्या शुभेच्छा आहेत.
comments