कारगील विजय दिवस

2016-07-23 17:49:49
     718 Views

कारगिलच्या लढाईतून भारतीय सैन्याने मिळविलेला विजय दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. यानिमित्ताने बीड येथे मंगळवार २६ जुलै रोजी सैनिकांप्रती अभिवादन करण्यासाठी समारोहाचे आयोजन केले आहे. या विजय दिवस समारोह निमित्ताने ही माहिती...
.
प्रमाणात घुसखोरी करत बर्फामुळे भारतीय सिमेवरील अनेक चौक्या च इतर प्रदेशावर कब्जा केला होता. तो भारतीय सेनेच्या निदर्शनात येताच त्यांना पिटाळून लावण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली . त्या मोहीमे सर्वात निकराचा आणि महत्वाचा पाडाव म्हणजे कारगीलची लढाई होय. देशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे ते जीवंत उदाहरण आजच्या पिढीसमोर आहे.
या लढाई मध्ये महत्वाचा भाग म्हणजे ०६ मे ते २६ जूलै ९९ या काळात भारतीस सेनेने आपल्या शौर्याची पराकाष्टा केली आणि अति विपरीत परिस्थितीत म्हणजे शत्रु उंच टेकडीवर आणि आपण त्यांच्या समोर दरीमध्ये त्यांच्याकडे रक्षा सामुग्री पुरविण्याचे मार्ग व इतर सामान सुव्यवस्थित असे असताना आपल्या सैनिकांनी १०० टक्के आपला भु-भाग अतिरेक्यांच्या ताब्यातुन मुक्त केला. तो ऐतिहासिक क्षण आपल्या सर्व भारतीयांच्या अंगावर शहारे आणणारा आहे. या कामात भारतीस सेनेचे जवळ जवळ ४८० जवान/अधिकारी तर ६० वायुसैनिकांना आपल्या जिवाचे बलिदान करावे लागले व १५०० वर जखमी झाले. या भारत मातेच्या वीर सुपुत्रामध्ये महाराष्टाचे ७ जण तर बीड जिल्हयाचा म्हणजे वडझरी ता. पाटोदा येथील सुपुत्र वीर शिपाई सुभाष सानप १८ गढवाल रायफलचे यांनी महान योगदान देऊन बीड जिल्हयाची परंपरा राखत शहीद झाले. या सर्व वीर सुपुत्राचे स्मरण करुन त्यांना मानाची मानवंदाना देण्याच्या दष्टीने विजय दिवसाचे आयोजन केले आहे.
आपल्या बीड जिल्हयातील ज्या शुर वीरांनी १९४७ च्या नंतरच्या वेगवेगळया चकमकीत लढयामध्ये किंवा सिमेवर भारत मातेचे रक्षण करताना स्वत च्या जिवाचे बलीदान करुन आपल्या मातेच्या पदरालाही दुष्टात्मा शत्रुचा स्पर्श होऊ दिला नाही अशा त्या ज्ञात अज्ञात भूमी पुत्राना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबिायांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने शासनतर्फे सर्व वीरमाता, वीर पत्नी यांचा ताम्रपट देऊन जूलै २००२ मध्ये सन्मान करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेले स्वांतत्र यांची गौरव गाथा महान आहे. त्यासाठी अनेकांनी बलीदान दिले. हाल अपेष्ठा सहन केल्या अनेक संसार (कुटूंब) उध्वस्त झाले तर अनेक कळया फुलण्याच्या अगोदरच कुस्करण्यात आल्या अशा त्या स्वातंत्र्य वीरांना पण शतश नमन करुन त्यांच्या या बलीदानाची परंपरा अबाधित राखुन त्यांनी अपार कष्टाने मिळविलेले स्वातंत्र अखंड ठेवण्याचे कार्य आपल्या भारत मातेचे सैनिक सुपूत्र करीत आहेत आणि करीत राहतील. यांत देशसेवेसाठी बलिदान करणा-यांचा वाटा सिंहाचा आहे . याचा अथर् इतर सैनिक प्राण पणाने लढून-देशसेवा केली आणि प्राणाची बाजी लावून यश मिळविले आणि त्या फळाचा आस्वाद घेणेसाठी त्या परम पित्या परमेश्वराने त्यांच्या जिवाचे अशा विपरीत परिस्थितीत रक्षण केले जे आज जिवंत आहेत त्यांचे कार्यही तितकेच महत्वाचे आहे. त्याच्या त्या वीरश्रीलाही मी तीतक्याच आदराने मानवंदाना करतो.
अति साहसाने बलीदानाने मिळविलेले स्वतंत्र टिकवून ठेवण्याचे काम आज भारतीय सैनिक करीत असून, जिंकलेल / परत मिळविलेले प्रदेश ताब्यात ठेवणे पण अति महत्वाचे - विशिष्ट अटकेपार जाऊनही आज तसे काम आहे. असे अनेक ज्ञात व अज्ञात वीर असतील जे समोर आले त्यांचा गौरव होतो ते एखादया धार्मीक स्थळाच्या मुकुटा प्रमाणे चमकतात पण त्यांना मुकूटा पर्यंत पोहचण्यास अनेक वीरश्री पायात अ आणि आधार स्तंभात भिंतीत आहेत त्यांचे महत्व ते खालच्या ठिकाणी आहेत म्हणून यत्कींचतही कमी होत नाहीत, उलट व्दिगुणीत होते कारण त्या शोभायमान मुकूटमण्यासाठी स्वत च्या स्वार्थाचा त्याग करुन त्यांना वाट करुन दिली.
शासनातर्फे प्रदान करण्यात आलेल्या ताम्रपटामध्ये पैसा नाही नौकरी नाही परंतु असंख्य देशबांधवाचे प्रेम यामध्ये ओतप्रत भरलेले आहे.या मधील तिरंगी झेंडयावरील मान चिन्ह प्रदर्शित करीत आहे की आम्ही सर्व भारतवंशीय त्या दु खाच्या प्रसंगी आपल्या दु खात सहभागी होतो. आजही आपल्या अडीअडचणीचे वेळी आपल्या पाठीशी आहोत आणि भविष्यात ही आपल्या हाकेला मान देऊन तात्काळ हजर राहण्याची ग्वाही देत आहोत. लाल व तांबट रंग आपण सांडलेल्या रक्ताची ग्वाही देत आहे आणि त्यांची जाणीव धरुन कृतज्ञता म्हणून आपल्या सर्वाच्या उन्नतीसाठी कुशलतेसाठी आमच्या जीवातला जीव प्राणातला प्राण वेळेतला वेळ काढून अखंड अविरत प्रयत्न चालु ठेऊ. अशी ग्वाही दिली जात आहे. त्या मान चिन्हावर तिन्ही सेनेचे प्रति म्हणजे सर्व सैनिक मग ते थल सेना, सैसेना, वायुसेना किंवा अर्धसैनिक बल असे आम्ही आपले मित्र बंधु आणि पाठीराखे आहात. त्या मागचा तिरंगा सळसळत्या वा-यात डौलदार फड फडणारा तिरंगा म्हणजे संपूर्ण अखंड भारत आणि स्वतंत्र भारतातील प्रत्येक तडफदार तरुण सळसळणा-या रक्तांची ग्वाही देऊन सांगाते कि त्या मातेची आण राखणा-या शुर वीरांनो बंधुनो या मातेची काळजी आम्ही घेतो. आम्ही आपल्या पाठीशी ठाम पणे आहेत निश्चिंत रहा. असा संदेशच जणू आम जनता सैनिकांना देत आहे. सेना कितीही ताकदवर असो जनतेच्या पाठींब्याशिवाय विजयश्री मिळवणे कठीण, आम्ही सर्वजण निश्चितीच आपल्या पाठीशी आहोत. आपण सदैव आपल्या देशाचे प्राणपणाने संरक्षण करावे. आम जनतेच्या, भारतीयांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत.... जय हिंद...

जिल्हा माहिती कार्यालय,
बीड.
comments