पंतप्रधान मोदीचे संयुक्त राष्ट्राला खडे बोल

2016-04-05 10:27:31
     507 Views

जागतीक पातळीवर सर्व राष्ट्रांची मिळणुन स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र संघटना एक सत्ता केंद्र आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत अमेरिका, इंग्लड, रशिया, फ्रान्स, चिन या राष्ट्रांचे वर्चस्व राहीले आहे. या राष्ट्रांनी अनेक वेळा आपल्या हितासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे कायदे पायदळी तुडीतले आहेत. मात्र तिस-या जगातील विकसनशिल राष्ट्रांनी एखादी गोष्ट केली तर मोठे आकांड तांडव केले जाते. याचा परिचय जगाला दहशतवादाच्या समस्येन आणुन दिला आहे. गेल्या चाळीस वर्षापासुन कमी अधिक प्रमाणात भारत आणि विकसनशिल राष्ट्रे ही दहशतवादा तोंड देत आहेत. मात्र अमेरिकेत ९-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगाला भारतावर होणा-या दहशतवादी हल्ल्याची जाणीव झाली. भारत दहशतवादाशी कसा मुकाबला करत आहे, हे त्यावेळी जगाला पटले. पण भारत कधीही दहशतवादा पुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही. जगापुढे सध्या दहशतवाद्याचे संकट असून त्याचा सामना करण्याचे आव्हान आहे. मात्र या दहशतावादाच्या आव्हाणाकडे विकशित राष्ट्रांनी हेतुपरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाला अजुन दहशतवादाची व्याख्या करता आली नाही असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुसेल्स येथे भारतीय नागरिकांना संबोधीत करताना व्यक्त केले. याची दखल जगभरातील सर्व माध्यमांनी घेतली आहे. भारत एका बाजुला जगात महासत्ता म्हणुन उदयाला येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला केलेले टार्गेट आणि त्यानंतर जगातील विकशित राष्ट्रांनी गप्प बसुन रहाणे. यावरुनच जगात भारताचा दबदबा वाढत आहे.
आपल्या बु्रसेल्स मधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे काय स्थान आहे हे दाखवुन दिले. सध्या जगापुढे आर्थिक संकटही उभारले आहे. मात्र, जगात सर्वाधीत तरूणांची संख्या असणारा भारत देश आता जागाला आशेचा किरण आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या मतांना प्रचंड टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देत मोदी यांच्या भारत आणि जगबाबतच्या भूमिकांना जोरदार पाठिंबा दिला. नुकताच ब्रुसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा दौरा आणि दहशतवाद विरोधी लढ्याचे असणारे आव्हान या विषयी त्यांनी दिलेले भाषण प्रभावी ठरले. त्यांचा हा दौरा ब्रुसेल्सच्या जनतेला मानसीक आधार मानला जात आहे. जगातील दहशतवादाचे विदारक चित्र मांडताना मोदी यांनी जगातील ९० देश कोणत्याना कोणत्या दहशतवादी हल्ल्याने ग्रस्त आहेत. त्यामध्ये हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत. दहशतवादाचे कोणत्या देशाच्या भूमीला नाही, तर संपूर्ण मानव जमातीला आव्हान आहे. दहशयवाद जेवढा भयानक आहे, त्याही पेक्षा त्याचे रूप ओळखण्यात आपण कमी पडतो हे भयावह वाटते. दहशतवादी लढ्यात मानवतावादी शक्तींची एकजूट दिसून येत नाही. त्यामुळे हा दहशतवादी ओळखणे ही काळाची मागणी आहे. आजपर्यंतच्या युध्दात जेवढे जवान भारताने गमावले नाहीत, तेवढे जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. अमेरिकेत ९-११ चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा जगाला भारतावरील दहशतवादी हल्ल्याची जाणीव झाली. पण भारत कधी दहशतवादी हल्ल्यांपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही. दहशतवादी हल्ल्यांना तोंड देणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी समाजात वातावरण निर्मिती झाली पाहिजे. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे. दहशतवादाला कोणत्याही धर्मांशी जोडू नका. दहशतवादाचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे, ज्या देशांमधून दहशतवादाला समर्थन मिळतं आणि त्याला खतपाणी घातलं जातंय त्या देशांवर संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मोदींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन केली.
दहशतवादाला शस्त्रांनी संपवता येणार नाही. मात्र कोणताही तरूण दहशतवादाकडे वळणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी समाजात बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं लागेल असेही मोदींनी स्पष्ट केले. मोदी यांनी बु्रसेल्स मध्ये दहशतवादावर मांडलेले विचार हे सनातनी आणि धर्मवादी राष्ट्र, संघटनांना पचणी पडणारे नाहीत. मात्र जगातील दहशतवदाचा विचार करता भारताने गेली चार दशके जे सोसले आहे. आणि ज्या पध्दतीने दहशतवादाशी तोंड दिले आहे. त्याची दखल युनोने घेणे आवश्यक होते. तसेच भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व देखिल युनोने बहाल करणे अपेक्षीत होते. मात्र विकशित राष्ट्राच्या दबावाखाली काम करणा-या संयुक्त राष्ट्र संघटनेला खडे बोल सुनावून जगात भारतााची एक महासत्ता अशी प्रतिमा निर्माण करण्यास हातभारच लावला आहे.
प्रा. विठ्ठल एडके
वसंतराव काळे पत्रकारीता आणि
संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
comments