प्रसारमाध्यमांत संधी

10-06-2016 : 02:18:00
     675 Views

बारावी नंतर काय हा प्रश्न आता काही मुला-मुलींना सतावत असणार. तर काहीचं बी.एस्सी., बी.कॉम. करायचं ठरलं असणार, तर काही विद्यार्थ्यांना मेडीकल, इंजिनीयरिंगला, तर काहींना बी.ए, तर कोणाला इंग्रजी लिट्रेचरमध्ये, तर कोणाला मराठी साहित्यामध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल. तर काही मुला-मुलींना प्रसारमाध्यमात/मिडीयामध्ये करिअर करायचं असेल तर अशाच प्रसारमाध्यमात करिअर करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा लेख..

बी.एम.एम. करून मिडीयामध्ये जाण्याची इच्छा बाळगणारे अनेक विद्यार्थी आहेत. कोणत्याही माध्यमांचा करिअर म्हणून विचार करण्यापूर्वी त्या क्षेत्रात किती पैसा मिळेल ? प्रसिद्धी किती मिळेल? यापेक्षा आपल्याला त्या-त्या माध्यमांत काम करायला आवडेल का ? हे महत्त्वाचे आहे. आज या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे.

आज महाराष्ट्रात अनेक विद्यापीठातून पत्रकारीता आणि जनसंवाद विषयाचे पदव्युतर शिक्षण उपलब्ध आहे. महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सर्वात आधी पत्रकारीता आणि जनसंवाद विषयाचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्यातआले. त्यानंतर पुणे, नागपूर, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, मुंबई येथील विद्यापीठातूनसुद्धा हा अभ्यासक्रम सुरू केला गेला. या विद्यार्थ्यांना माध्यम क्षेत्रातील तज्ञांचं आणि गाजलेल्या व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शनसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. गेल्या काही वर्षामध्ये काही खाजगी कॉलेजांमधूनही पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध झालं आहे.

महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठामध्ये बहुदा बारावीनंतर सर्वप्रथम बी.एम.एम.चा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या काही निवडक विद्यापीठांमधून सुरु करून देण्यात आला. काही विद्यापीठात हा अभ्यासक्रम मराठीमध्येही सुरु झाला आहे.

या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

विद्यार्थ्यांना खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात संधी आहेत. सरकारी क्षेत्रात शासनाच्या विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयातील माहिती संचालक, जिल्हाधिकारी, क्षेत्रीय प्रचार कार्यालय इत्यादी ठिकाणी पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी काम करु शकतात.

त्याचबरोबर तुम्ही माध्यम क्षेत्राशी निगडीत स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये चित्रपट, टि.व्ही., मुद्रीत माध्यमे, इंटरनेट इत्यादी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरू करु शकता. तसेच चित्रपट निर्मिती, मालिका निर्मिती, जाहिरात संस्था विविध निर्मिती संस्था यामधून आणखीन शिकण्याची तसेच काम करण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी आहे.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया, छायाचित्रकार, रेडिओ जॉकी, ध्वनी संकलन, व्हॉइस - ओव्हर आर्टिस्ट, बातमी विश्लेषक, जनसंपर्क अशा संधी उपलब्ध आहेत.

पण केवळ पदवी घेऊन मिडीयाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापेक्षा पदवीबरोबरच इतर स्किल्सही तितकीच महत्त्वाची आहेत. भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबर इतर प्रादेशिक भाषाही गरजेच्या आहेत. प्रिंट, वेब, इलेक्ट्रॉनिक मीडिया बरोबर काम करताना भाषांतर हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. विदेशी भाषा येत असतील तर उत्तमच. तो तुमचा प्लस पॉइन्ट ठरेल. तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी स्टील फोटोग्राफी, क्वार्क एक्सप्रेस, इन डिझाइन, पेज मेकर, एडिटींग, कोरल ड्रॉ, डी.टी.पी. फोटोशॉप यासारखी सॉफ्टवेअरमध्ये पारंगत होणे आवश्यक आहे.

भाषाशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, लॉ यासारख्या विषयाचे ज्ञान पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक आहेत. सोशल नेटवर्कींगचा जास्तीत जास्त आणि योग्य वापर करावा. वाचन, पाहाणं इत्यादी बरोबर लिहीणंही आवश्यक आहे. ब्लॉग असणं उत्तमच त्याने लिखाणाची शैली तयार होते.

पदवी जितकी गरजेची आहे तितकीच स्किल्सही महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात तर नक्कीच तुम्हाला अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

बारावीच्या निकाला नंतर साधारण बी.एम.एम. च्या प्रवेशाला सुरुवात होते. साधारणत: जुलै अखेरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असते.

पात्रता- बारावी उत्तीर्ण सायन्स, कॉमर्स आणि आर्टसच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीप्रमाणे प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते.

प्रवेश पद्धत- काही महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन तर काही महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज स्विकारले जातील.

माध्यमांत आपले करिअर करु पाहणाऱ्यांना दोन गोष्टींवर सतत मेहनत करावी लागते. औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी किंवा घेत असतांना आणि त्यानंतरच्या व्यावसायिक जीवनात भाषा आणि संदर्भ यांवर सतत काम करणे अपेक्षित आहे. माध्यम व्यावसायिकाला भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे कारण अभिव्यक्त होण्यासाठीचे ते मुलभूत साधन आहे. कुठलीही विषयनिर्मिती विशिष्ट संदर्भात होत असते त्यामुळे आपण हाताळत असलेल्या विषयाचे संदर्भ सतत तपासून अद्ययावत असावे लागते,

१२ वी पास विद्याथ्र्यांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, बीड, ९५५२५५६३९७ ९५२७८१५१५१ ७४२०९०४०५५
comments