आयपीएल सामन्यांसाठी सांडपाणी वापरणार’

2016-04-13 8:12:02
     436 Views

मुंबई- महाराष्ट्रात होणा-या आयपीएल सामन्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान बीसीसीआयने आपली बाजू मांडली.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान बीसीसीआयने न्यायलयात आपली बाजू मांडली.
मुंबई आणि पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा आयपीएल सामन्यांमध्ये वापर करण्यात येणार आहे. तसेच नागपूरमध्ये होणारे किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्यास तयार असल्याचेही शुक्ला यांनी यावेळी सांगितले.
यावर न्यायालयाकडून अद्यापही कोणता निर्णय आलेला नाही.
comments