वेस्ट इंडिजचा महान विजय

2016-04-01 10:42:17
     463 Views

मुंबई- वेस्ट इंडिजने वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी भारतावर महान विजय मिळवला. यजमानांना ७ विकेट आणि २ चेंडू राखून हरवत माजी विजेत्यांनी दिमाखात टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली.
गेल ‘फेल’ ठरला तरी स्पर्धेत पहिलीच लढत खेळणा-या लेंडल सिमन्सने ५१ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.
१९३ धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजची सुरुवात खराब झाली. दुस-या षटकातील दुस-या चेंडूवर जसप्रीत बुमराने ख्रिस गेलचा त्रिफळा उडवल्यानंतर भारताच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मात्र जिगरबाज सिमन्सने हार मानली नाही. सलामीवीर जॉन्सन चार्ल्ससह तिस-या विकेटसाठी १०.१ षटकांत ९७ धावांची बहुमोल भागीदारी करताना वेस्ट इंडिजचे आव्हान कायम ठेवले.
खउउ थढ२० ारींलहदुखापतग्रस्त आंद्रे फ्लेचरच्या जागी संधी मिळालेल्या सिमन्सने भारताच्या गोलंदाजांचा सुरेख समाचार घेतला. सिमन्सने ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९२ धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी साकारली.
त्याला चार्ल्स (५२) आणि आंद्रे रसेलची (नाबाद ४३) सुरेख साथ लाभली. चार्ल्सने दोन तर रसेलने तीन षटकार ठोकले.
सिमन्ससह वेस्ट इंडिजचे नशीब जोरावर होते. तो दोनदा झेलबाद झाला. मात्र ऑफस्पिनर आर. अश्विन आणि मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंडय़ाचे ‘ते’ चेंडू ‘नोबॉल’ ठरले.
१८व्या षटकात बुमराच्या गोलंदाजीवर सिमन्सने लाँग ऑन सीमारेषेच्या दिशेने चेंडू फटकावला. जडेजाने हवेतच चेंडू सीमारेषेवरून आत फेकला.
त्यानंतर कोहलीने झेल टिपल्यानंतर सिमन्सचा अवतार संपला, असे वाटले. मात्र क्षेत्ररक्षण करताना जडेजाचा पाय सीमारेषेला लागल्याने सिमन्सला षटकार मिळाला.
अजिंक्य-रोहितने रचिला पाया विराट झालासी कळस
खपव/थए थढ२० डशाळ षळपरश्र ारींलह ळप र्चीालरळभारताच्या मदतीला पुन्हा एकदा विराट कोहली धावला. त्याच्या ४७ चेंडूंतील नाबाद ८९ धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने २ बाद १९२ धावा अशी चांगली धावसंख्या उभारली. मुंबईकर अजिंक्य रहाणे (४०) आणि रोहित शर्माच्या (४३) दमदार फलंदाजीमुळे भारताने प्रतिस्पर्ध्यासमोर चांगले आव्हान उभे केले. गुरुवारची धावसंख्या ही भारताची टी-२० वर्ल्डकपमधील दुस-या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या आहे.
विराटने पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करताना तिसरे अर्धशतक ठोकले. वैयक्तिक कामगिरीत सातत्य राखताना त्याने अजिंक्यसह दुस-या विकेटसाठी ४९ चेंडूंत ६६ तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह तिस-या विकेटसाठी केवळ २७ चेंडूंत नाबाद ६४ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेच्या घरात नेले. यजमानांची यंदाच्या वर्ल्डकपमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. कोहलीच्या ४७ चेंडूंतील नाबाद ८९ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विराटप्रमाणेच रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचे योगदानही भारताच्या बहरलेल्या फलंदाजीत मोलाचे ठरले.
खउउ थढ२० डशाळ ऋळपरश्र ारींलहफॉर्मात नसलेल्या शिखर धवनला वगळताना अजिंक्यला अंतिम संघात संधी देण्यात आली. त्याने रोहित शर्मासह डावाची सुरुवात करताना ६२ धावांची दमदार सलामी दिली. रोहितला सॅम्युअल बद्रीने पायचीत पकडताना भागीदारी संपुष्टात आणली. त्याने ३१ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश आहे. अजिंक्यने एक बाजू लावून धरताना विराटला चांगली साथ दिली. त्याने ३५ चेंडूंत २ चौकारांसह ४० धावा करताना संधीचे सोने केले.
भारताच्या फलंदाजांनी दहा षटकांत दहाच्या सरासरीने धावा चोपल्या. सर्वाधिक धावा सहाव्या षटकात निघाल्या. आंद्रे रसेलच्या त्या षटकात रोहित शर्माने दोन षटकार आणि एका चौकारासह २० धावा चोपल्या. शेवटच्या ४ षटकांतही १७ (ब्राथवेट), ड्वायेन ब्राव्हो (११), रसेल (१९) आणि ब्राव्हो (१२) अशा ५९ धावा चोपल्या. वेस्ट इंडिजचे क्षेत्ररक्षण सुरेख झाले. त्यांनी १५-२० धावा अडवल्या.
उपांत्य फेरीसाठी भारताने दोन बदल केले. फॉर्मात नसलेला सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतग्रस्त अष्टपैलू युवराज सिंगच्या जागी अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडेला संधी देण्यात आली. प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजनेही दोन बदल करताना अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या इविन लेविस आणि दुखापतग्रस्त आंद्रे फ्लेचरच्या जागी फटकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि लेंडल सिमन्सला अंतिम संघात स्थान दिले.
सर्वाधिक धावा करणा-यांमध्ये चौथ्या स्थानी
जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने टी-२० वर्ल्डकपच्या एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली. पाच सामन्यांत १३६.५०च्या सरासरीने कोहलीने एकूण २७३ धावा फटकावल्यात. तुम्हाला ठाऊक असेल की नाही, मात्र अव्वल स्थानी कोहलीच आहे. मागील वर्ल्डकपमध्ये (२०१४) त्याने १०६.३३च्या सरासरीने ३१९ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणा-यांमध्ये श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने दुस-या आवृत्तीत (२००९) ५२.८३च्या सरासरीने ३१७ धावा केल्यात.
comments