फोर्ब्सच्या यादीत विराटबरोबर सानिया आणि सायनाचाही समावेश

2016-02-26 12:14:29
     485 Views

‘टीम इंडिया’ चा कसोटी कर्णधार विराट कोहली, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि टॉप बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आशियातील ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे गुणी, कर्तृत्ववान खेळाडू ठरले असून फोर्ब्स या जगप्रसिद्ध पत्रिकेच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत ५० भारतीयांचा समावेश करण्यात आला असला तरीही पहिल्या टॉप तीन मध्ये हे तिघे आहेत.
फोर्ब्सच्या ३० अंडर-३० आशिया सूचीत भारत, इंडोनेशिया, चीन, हॉंगर्कॉग, सिंगापूर, जपान, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातील त्या ३०० युवा उद्योगपती आणि नेतृत्वकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या यादीत ५६ भारतीयांचा समावेश आहे. ज्यात कोहली, सानिया, सायना आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सर्वोच्च स्थानी आहेत. २०१५ मध्ये एक कोटी १३ लाख डॉलरची सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिलेब्रिटी कोहलीविषयी फोर्ब्सने म्हटले आहे, ‘भारताची क्रिकेट संस्कृतीच्या सर्वोच्च स्थानी आक्रमक फटकेबाज कोहली आहे, ज्याने आपल्या उत्कृष्ट खेळाने भारताला जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत एततर्फी विजय प्राप्त करून दिला होता.
सानिया बाबत फोर्ब्सने म्हटले आहे की, २९ वर्षीय सानियाने जेव्हा २००३ मध्ये वायाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिकदृष्ट्या टेनिस खेळणे सुरू केले तेव्हापासूनच एक यशस्वी महिला खेळाडू म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. भारतात सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूतही तिचा समावेश असल्याचे पत्रिकेने म्हटले आहे. ती यावेळी आपली जोडीदार मार्टिना हिंगिसबरोबर जगातील टॉप महिला दुहेरी टेनिस खेळाडू आहे.
फोर्ब्सने २५ वर्षीय बॅडमिंटनपटू सायनाचा उल्लेख आदर्श आणि फुलराणी अशा शब्दांत केला आहे. जगातील क्रमांक एकची महिला खेळाडू विश्‍वातील त्या टॉप २४ खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांची निवड आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या विचाराधीन आहे, असेही फोर्ब्सने म्हटले आहे.
फोर्ब्स ३०, अंडर-३० आशियाच्या सूचीत एकूण १० श्रेणी आहेत. या सूचीत ग्राहक तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रान, कला, आरोग्य, विज्ञान, माध्यमे, सामाजिक क्षेत्र, अर्थ व अन्य क्षेत्रातील कर्तबगार युवकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
comments