टी-२० वर्ल्डकपसाठी अखेर अजिंक्यच

10-02-2016 : 11:25:23
     753 Views

नवी दिल्ली- टी-२० आशिया कप आणि टी ह्न २० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. दोन्ही संघासाठी कर्णधार म्हणून धोनीची निवड करण्यात आली. अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मनीष पांडेला संघात स्थान मिळाले नाही.

टी-२० आशिया कप आणि टी ह्न २० वर्ल्डकपसाठी संघात धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, युवराज, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, अश्विन, हरभजन सिंग, बुमराह, आशिष नेहरा, पवन नेगी आणि मोहम्मद शामीचा समावेश करण्यात आला आहे.

दिल्ली येथे टी-२० आशिया कप आणि टी ह्न २० वर्ल्डकपसाठी शुक्रवारी बीसीसीआयची बैठक घेण्यात आली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक झाली.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी या बैठकीला उपस्थि होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये संघाची घोषणा करण्यात आली.
comments