अनुष्का-विराटचा ब्रेकअप?


मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपचे वृत्त वा-यासारखे पसले आहे. त्यांच्या ब्रेकअपसंदर्भात एक नवा खुलासा समोर आला आहे. सांगण्यात येत आहे की, विराटने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केले. मात्र अनुष्काने त्याचे प्रपोजल धुडकावून लावले. यानंतर दोघांमध्ये साधारणपणे एका महिण्यापासून अबोला आहे.

अनुष्काने का धुडकावले विराटचे प्रपोजल...
- मीडिया रिपोट्र्सनुसार विराटला याचवर्षात अनुष्कासोबत लग्न करण्याची इच्छा होती.
- जेव्हा विराटने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा बॉलीवुड अ‍ॅक्टड्ढेस अनुष्काने त्याचे हे प्रपोजल धुडकावून लावले.
- ती म्हणाली की, सध्या तिला करिअरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. तिचा २०१७ आधी लग्न करायचा कसलाही विचार नाही.
- या मुद्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडनही झाले. साधारणपणे एका महिन्यापासून या दोघांचे संभाषण बंद आहे.
- रिपोट्र्सने दावा केला आहे की, या कारणामुळेच विराटने अनुष्काला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले.
सर्वप्रथम इंस्टाग्रामवरच मिळाला होता ब्रेकअपचा संकेत
- या आधी वृत्त प्रसारित झाले होते की, विराट आणि अनुष्काने एक-मेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले.
- मीडिया रिपोट्र्सच्या मते विराटचे फॅन अकाउंट चलावणा-या एका चाहत्याच्या हे लक्षात आले.
- त्याने ट्वीट केले- तळीरीं अर्पीीहज्ञर्र ीपषेश्रश्रेुशव शरलह ेींहशी ेप ळपीींरसीरा (विराट आणि अनुष्का शर्माने एक-मेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.)
- या नंतर शेकडो चाहते ट्वीट करून या दोघांना यामागचे कारण विचारत होते. मात्र अद्याप या दोहोंपैकी कुणीही चाहत्यांना उत्तर दिलेले नाही.
- असे असले तरी, अनुष्का अद्यापही विराटला ट्विटरवर फॉलो करत आहे.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)